सराईत दोघा सोनसाखळी चोरट्यांना अटक

By Admin | Updated: October 19, 2014 16:50 IST2014-10-19T00:19:36+5:302014-10-19T16:50:20+5:30

सराईत दोघा सोनसाखळी चोरट्यांना अटक

Saraiyat two Sonskhali thieves arrested | सराईत दोघा सोनसाखळी चोरट्यांना अटक

सराईत दोघा सोनसाखळी चोरट्यांना अटक


नाशिक : सराईत गुन्हेगार चेकिंग मोहीम राबवित असताना, अट्टल सोनसाखळी चोरटे संशयित बाळकृष्ण ऊर्फ कल्लू बापूराव काकड व नीरज वर्मा हे तवली फाट्यावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांना युनिट-१ चे अधिकारी व कर्मचारी यांनी नवीन जकात नाका परिसरात शिताफीने पकडले़ या दोघांनीही शरणपूररोड, द्वारका, काठे गल्ली या ठिकाणी सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून एक दुचाकी व सोन्याचे दागिने असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
अट्टल सोनसाखळी चोरटे बाळकृष्ण ऊर्फ कल्लू बापूराव काकड व नीरज वर्मा हे दोघे रविवारी (दि़ १२) दुचाकीवरून (क्र. एमएच १५ सीएन-६८०९) तवली फाट्याजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नवीन जकात नाक्यावर या दोघांना पकडले़ शरणपूररोड टिळकवाडी येथून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे़ तसेच या दोघांकडून एक दुचाकी व सोने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अकिल शेख, सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पळशीकर, पोलीस हवालदार बाळासाहेब दोंदे, विश्वास बागुल, चंद्रकांत सदावर्ते, भांड, पोलीस नाईक सुरेश माळोदे, शरद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल काठे, काटकर, टेमगर, महिला पोलीस शिपाई नाजुका हुलवळे आदिंनी ही कारवाई केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Saraiyat two Sonskhali thieves arrested