खाकुर्डीच्या सेवा इंग्लिश स्कुलमध्ये संत गाडगे महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST2021-02-24T04:15:11+5:302021-02-24T04:15:11+5:30

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक ए. डी. शिरोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक टी. जी. अहिरे उपस्थित होते. उपशिक्षक ...

Sant Gadge Maharaj Jayanti at Seva English School, Khakurdi | खाकुर्डीच्या सेवा इंग्लिश स्कुलमध्ये संत गाडगे महाराज जयंती

खाकुर्डीच्या सेवा इंग्लिश स्कुलमध्ये संत गाडगे महाराज जयंती

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक ए. डी. शिरोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक टी. जी. अहिरे उपस्थित होते. उपशिक्षक ए. डी. शिरोळे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपशिक्षक पी. जी. उशिरे, बी. आर. निकम, पी. बी. भदाणे, डी. जी. पाटील, व्ही. व्ही. कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. शिरोळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याबद्दलची माहिती दिली. उपशिक्षक डी. बी. काकळीज, श्रीमती ए. डी. बच्छाव, आर. बी. बोरसे, व्ही. डी. जानी, श्रीमती एस. डी. गायकवाड, बी. एस. पगार, के. एस. भदाणे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.

===Photopath===

230221\23nsk_12_23022021_13.jpg

===Caption===

खाकुर्डी विद्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी मुख्याध्यापक टी. जी. अहिरे. समवेत पी. जी. उशीर, दत्ता काकळीज आदी.

Web Title: Sant Gadge Maharaj Jayanti at Seva English School, Khakurdi