शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त स्वत:च लढा देण्याच्या तयारीत

By admin | Updated: September 6, 2016 01:42 IST

समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त स्वत:च लढा देण्याच्या तयारीत

घोटी : शासनाच्या प्रस्तावित समृद्धी महामार्ग व स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी इगतपुरी तालुक्यातील बावीस गावांतील सुपीक शेतजमीन संपादित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या रस्त्याला आणि नोड प्रकल्पाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडवा विरोध केला असून, याबाबत नाराजीचे धुमारे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहेत. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याने तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागनार असल्याने कोणत्याही स्थितीत जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांच्या पाठीशी राजकीय पक्ष खंबीर पणे उभे असल्याचा दिखाऊपणा तालुक्यात पाहण्यास मिळत असून, इतर तालुक्याच्या तुलनेत या तालुक्यात कोणताही राजकीय पक्ष आतापर्यंत शेतकऱ्याच्या पाठीशी रस्त्यावर उतरला नसल्याने राजकीय पक्ष दिखाऊपणा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.इगतपुरी तालुक्यातील बावीस गावे या प्रकल्पामुळे बाधित होत असून या तालुक्याला छेदून हा रस्ता जात असल्याने आधीच विविध प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. याच तालुक्यात शेणवड बु व कवडधरा या दोन ठिकाणी प्रत्येकी बाराशे हेक्टर जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्यात येणार असून यासाठी जमिनी घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने तालुक्यातील शेतकरी संभ्रमात पडला आहे.अश्रू पुसण्यासाठी कोणीच नाहीनिवडणुकीच्या काळात मतांचा जोगवा मागण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी तर केवळ प्रसिद्धी साठी या प्रकल्पाला दिखाऊ विरोध दर्शवित आपले प्रसिद्ध झालेले फोटो सोशल मीडियावर टाकून धन्यता मानत असल्याचे ही दिसून येते.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे नाटक करीत असल्याने शेतकरी स्वत:चा लढा स्वत:च लढण्याच्या तयारीत आहेत.