शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाची विक्री; जमिनीचा लिलाव स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:29 IST

मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची सोमवारी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या लिलावात केवळ चारचाकी वाहनाची चार लाख ८० हजाराला विक्री झाली आहे.

तालुक्यातील पिंपळगाव (दा.) येथील माजी सरपंच मीना सुनील पवार यांनी हे वाहन खरेदी केले आहे, तर जमिनीच्या लिलावात कोणीही भाग व अनामत रक्कम भरली नसल्याने लिलाव स्थगित करण्यात आला. या जमिनीचा फेरलिलाव करण्यात येणार आहे.कसमादे परिसरातील कांदा उत्पादकांचे कांदा विक्री पोटीचे पैसे सूर्यवंशी यांच्याकडे अडकले आहेत. दोन कोटी ९० लाख ५४ हजार २६४ रुपयांसाठी सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांचे थकीत पैसे अदा केले जाणार आहेत. सोमवारी सूर्यवंशी यांचे वाहन (क्र. एमएच ४१ व्ही ७४१०) तसेच मुंगसे येथील गट क्रमांक ९१/१ मधील ०.७३ आर क्षेत्र, गट क्रमांक ९१/२ मधील ०.७३ आर क्षेत्र, गट क्रमांक ११२/१ मधील ०.३६.५० आर क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी वाहनाचा लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेत मीना पवार, मोहन जगताप, दीपक जगताप यांनी भाग घेतला. वाहनाचे मूल्यांकन चार लाख रुपये ठेवण्यात आले होते. ४ लाखाच्या पुढे बोली बोलली जाणार होती. या बोली प्रक्रियेत मीना पवार यांनी चार लाख ८० हजार बोली बोलून वाहन खरेदी केले आहे तर जमिनीचे मूल्यांकन १७२ आर क्षेत्राचे ९२ लाख रुपये धरण्यात आले होते. मात्र या जमिनी लिलाव प्रक्रियेत कोणीही सहभाग घेतला नाही तसेच अनामत रक्कम भरली नाही म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी जमिनीचा लिलाव स्थगित करत फेरलिलाव घेण्यात येणार असल्याचे घोषित केले. लिलाव प्रक्रियेदरम्यान बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, शांताराम लाठर, सचिव अशोक देसले, राजाभाऊ खेमनार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड