श्री स्वामीनारायण मंदिरात सद्गुरू वंदना महोत्सव

By Admin | Updated: May 4, 2017 00:38 IST2017-05-04T00:35:21+5:302017-05-04T00:38:31+5:30

विविध धार्मिक कार्यक्रम : श्रीमद्भागवत कथा

Sadguru Vandana Mahotsav in Shri Swaminarayan Temple | श्री स्वामीनारायण मंदिरात सद्गुरू वंदना महोत्सव

श्री स्वामीनारायण मंदिरात सद्गुरू वंदना महोत्सव

पंचवटी : श्री स्वामी नारायण मंदिरात तपोवन ब्रह्मचर्य आश्रम व श्री स्वामी नारायण मंदिराची निरंतर सेवा करणाऱ्या पुराणी स्वामी श्री ज्ञानजीवनदासजी यांच्या ७८ व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सदगुरू वंदना महोत्सवाला विधिवत प्रारंभ करण्यात आला. सकाळी ८ वाजता साधू-महंतांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी गणपती आणि पोथीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर चार वाजता रामकुंडावर पोथी व जलाचे विधिवत पूजन करण्यात येऊन श्री स्वामी नारायण मंदिरापर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. ३ ते १० मे या कालावधीत धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राकेशप्रसाद महाराज, गुरूशरण महराज, कल्याणदास, जंगलीदास महाराज, बाबा रामदेव, मुरारी बापू, रमेश ओझा, आनंद भास्कर, बाल योगेश्वरदास, सागरानंद महाराज, चैतन्य महाराज, माधवतीर्थजी, कृष्णदास, गणेशदास, राजेंद्रदास, जयरामगिरी, कनिरामबापू आदींसह विविध ठिकाणचे साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. रविवारी म्युझिक इव्हेंटमध्ये स्वप्नील बांदोडकर यांचा कार्यक्रम होईल. सोमवारी गायक सम्राट पूरव गुरुवारी मनहर उधास और साथी यांचा गजल संध्या, शुक्रवारी म्युझिक नाइट कार्यक्रमात सुरेश वाडकर, हेमंतकुमार महाले तर शनिवारी हर्षदभाई मिस्त्री व सह कलाकार भक्तिसंगीत सादर करतील. (वार्ताहर) स्वामी माधवप्रकाश तथा ट्रस्टी मंडळ, सेवकगण यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवात नारायणदासजी हे भागवत कथाकथन करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात रात्री नितीन देसाई व हास्य कलाकार भाग्येश वोरा यांचा कार्यक्रम झाला.

Web Title: Sadguru Vandana Mahotsav in Shri Swaminarayan Temple