शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलीस, क्र ीडा प्रबोधिनी या संघांना अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 17:56 IST

मनमाड : नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरु षांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस तर महिलांमध्ये क्र ीडा प्रबोधिनी,नाशिक या संघांनी अजिंक्यपद पटकाविले.

ठळक मुद्दे मनमाड : नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरु षांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस तर महिलांमध्ये क्र ीडा प्रबोधिनी,नाशिक या संघांनी अजिंक्यपद पटकाविले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्र ीडांगणावर मनमाड बॉइज संघाच्या यजमान पदाखाली स्पर्धेमध्ये

मनमाड : नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरु षांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस तर महिलांमध्ये क्र ीडा प्रबोधिनी,नाशिक या संघांनी अजिंक्यपद पटकाविले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्र ीडांगणावर मनमाड बॉइज संघाच्या यजमान पदाखाली स्पर्धेमध्ये पुरु षांच्या उपांत्य फेरी सामन्यात क्र ीडा प्रबोधिनी, नाशिकने ब्रह्मा,आडगाव संघाचा २६-४१ धुव्वा उडविला तर दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस संघाने एनटीपीएस, एकलहरे संघाला २१-१८ गुणांनी धूळ चारीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात नाशिक ग्रामीण पोलीस संघाने क्र ीडा प्रबोधिनी संघाचा ४७-१३ गुणांनी एकतर्फी पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. नाशिक ग्रामीण संघाकडून विक्र ांत मांगडे, कपालेश्वर ढिकले, फैजूल रहेमान यांनी चौफेर चढाया केल्या. दिनेश जाधव यांनी अचूक पकडी केल्या.महिलांच्या उपांत्य फेरीमध्ये क्र ीडा प्रबोधनी, नाशिक संघाने कै. उत्तमराव ढिकले पिंप्री संघाचा ४०-७ फरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर दुसºया उपांत्य फेरीमध्ये अटीतटीच्या सामन्यात शिखरेवाडी, नाशिकरोड संघाने शिवशक्ती आडगाव संघाचा २०-२२ संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात क्र ीडा प्रबोधिनी, नाशिक संघाने शिखरेवाडी, नाशिकरोड संघाचा ४३-२७ असा फरकाने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले.या स्पर्धेतून नाशिक जिल्ह्याचा महिला व पुरु षांच्या कबड्डी संघाची निवड करण्यात येणार असून, चिपळूण-रत्नागिरी येथे होणाºया राज्य अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.अजिंक्यपद पटकावलेल्या संघास नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या दिवंगत गणपत आहिरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा फिरता चषक देऊन गौरविण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, रिपाइं शहराध्यक्ष दिलीप नरवडे, कामगार नेते अनिलदादा निरभवणे , कैलास आहिरे, डॉ. शरद शिंदे, वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, समाजसेवक संजय कटारे, पापा थॉमस, पंच मंडळाचे सतीश सूर्यवंशी, कैलास खैरे आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. मनमाड बॉइज संघाचे प्रमुख शेखर आहिरे, भूषण दरगुडे, रोहन बागुल, चेतन पगारे, प्रवीण व्हडगर, तेजस भडके, आदेश कदम, ओम कदम, ऋषिकेश आव्हाड, बापू पगारे, नचिकेत वाघ, प्रफुल्ल आहिरे, प्रफुल्ल बागुल, दिलीप शिरसाठ यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.