बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 08:10 IST2021-11-21T08:06:34+5:302021-11-21T08:10:23+5:30

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली.

The ruling opposition together in a marriage of MLA devyani pharande daughter | बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

नाशिक: राजकीय व्यासपीठावर एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सत्ताधारी, विरोधकांनी शनिवारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची संधी न सोडता स्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खूश केले. मात्र, त्यानंतर अवघ्या तासभराने विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येत एकमेकांच्या गळ्यात गळा घातला. 

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली. तत्पूर्वी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा भाग म्हणून सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सिडकोतील कार्यक्रमात भाजपचा करेक्ट कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी करण्यात आला, असे सांगत खिजविले.

मात्र, विवाह सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, खासदार संजय राऊत, पालकमंत्री छगन भुजबळ आदी सहभागी झाले. 
 

Web Title: The ruling opposition together in a marriage of MLA devyani pharande daughter