शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या वादातून कार्यालयावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 02:02 IST

वडाळारोडवरील काजीनगर भागात नसीम व्हिला नावाच्या सोसायटीत असलेल्या तन्वीर जब्बार खान यांच्या कार्यालयात सुमारे पंचवीस इसमांनी बळजबरीने घुसून त्यांना ‘फरांदे यांचे काम का करतो’ असा प्रश्न करत मारहाण करून टेबलावरील रोकड, दागिने अशी एकूण ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयित व त्यांच्या साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देवडाळारोडवर टोळक्याचा हल्ला : पाच लाखांची रोकड, दागिने लंपास

नाशिक : वडाळारोडवरील काजीनगर भागात नसीम व्हिला नावाच्या सोसायटीत असलेल्या तन्वीर जब्बार खान यांच्या कार्यालयात सुमारे पंचवीस इसमांनी बळजबरीने घुसून त्यांना ‘फरांदे यांचे काम का करतो’ असा प्रश्न करत मारहाण करून टेबलावरील रोकड, दागिने अशी एकूण ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयित व त्यांच्या साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, काजीनगरमधील खान यांच्या कार्यालयवजा घरात बळजबरीने शिरून टोळक्याने त्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत संशयित युनूस तांबोळी, फारूख तांबोळी, इमरान तांबोळी, एजाज तांबोळी, रिजवान तांबोळी, शकील तांबोळी, दानिश तांबोळी, इकबाल तांबोळी, इरफान तांबोळी, लड्या तांबोळी यांच्यासह वीस ते पंचवीस इसमांनी बळजबरीने प्रवेश के ला. ‘तू फरांदेबाई यांचे काम कशाला करतो’ असा दम भरत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या झटापटीत टेबलावरील रोकड, दागिने असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून टोळक्याने पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयित दहा हल्लेखोर व त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Crime Newsगुन्हेगारी