शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासात न घेतल्याची रिपाइंला खंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:27 IST

रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अशा जागा सोडून रिपाइंला अडचणीत आणले

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षांचा परजिल्ह्यात प्रचार : युतीकडून दुय्यम वागणूकीचा आरोपझेंडा वापरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोठेही स्थान दिले जात नसल्याची खंत

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाला संपूर्ण उत्तर महाराष्टÑात एकही जागा न सोडण्यात आल्याने अगोदरच नाराजी असताना त्यातच महायुतीच्या उमेदवारांकडून निवडणूक नियोजन व प्रचारात रिपाइंच्या नेत्या, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत आहे. त्यामुळेच की काय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी नाशिक जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकडे पाठ फिरवून उत्तर महाराष्टÑातील अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे.

रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अशा जागा सोडून रिपाइंला अडचणीत आणले आहे. नाशिक जिल्ह्यात एकही जागा रिपाइंला मिळू शकली नाही. या पक्षाच्या वतीने देवळाली व पश्चिम मतदारसंघाची मागणी केली गेली, मात्र तीदेखील मान्य करण्यात आली नाही त्यामुळे पक्षाचा अधिकृत एकही उमेदवार नसल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच युतीच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करताना रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले नाही. रिपाइं महायुतीत सहभागी असल्याने भाजपा व सेनेने त्या प्रमाणात रिपाइंला प्राधान्य द्यावयास हवे, मात्र रिपाइंचा फक्त झेंडा वापरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोठेही स्थान दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात भाजप-सेनेकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळेच जिल्हाध्यक्ष प्रकार लोंढे यांनी उत्तर महाराष्टÑातील अन्य जिल्ह्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. जिल्हाध्यक्षच शहरात नसल्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांनीदेखील प्रचारातून अंग काढून घेतले आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारपत्रकात पाहिजे त्या प्रमाणात रिपाइंला स्थान दिले जात नसल्याची तक्रार आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र न लावणे, पक्षाचे नाव न टाकणे, स्थानिक रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून व नियोजनापासून डावलणे असे प्रकार युतीकडून केले जात आहेत. नाशिक शहरात रिपाइंचे मतदान पाहता, पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची जाहीर सभा घेण्याचे ठरत असताना युतीच्या उमेदवारांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असले तरी, त्याविषयी कोणतेही नियोजन केले जात नसल्याचे पाहून पक्षाला व कार्यकर्त्यांना मानसन्मान नसेल तर घरात बसणेच योग्य राहील, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक