पिंप्रीसद्रोद्दीन उरु सात कुस्त्यांची दंगल

By Admin | Updated: September 26, 2016 23:28 IST2016-09-26T23:27:14+5:302016-09-26T23:28:56+5:30

इगतपुरी : राज्यभरातील नामवंत पहिलवानांचा सहभाग, खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव

The riot of seven wrestlers of Pimpri Sudrodin Uro | पिंप्रीसद्रोद्दीन उरु सात कुस्त्यांची दंगल

पिंप्रीसद्रोद्दीन उरु सात कुस्त्यांची दंगल

इगतपुरी : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसद्रोद्दीन येथील पीर शहंशाह सद्रोद्दीन बाबा यांच्या उरुसानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती.
खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते कुस्तीला शुभारंभ करण्यात आला. यात लहान मुलांपासून राज्यभरातील नामवंत पहिलवानांनी सहभाग घेतला होता. पहिलवावांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी सभापती रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी सभापती कावजी ठाकरे, संदीप पाटेकर, विठ्ठल लंगडे, अनिल भोपे, त्र्यंबक गुंजाळ, समाधान गुंजाळ, पोलीसपाटील रमेश पाटेकर, सरपंच भास्कर सोनवणे, माजी सरपंच त्र्यंबक उबाळे, प्रकाश उबाळे, तुकाराम वाकचौरे, मुगणी पटेल, बाबू ताहीर, शांताराम उबाळे, अनिल उबाळे, सरपंच गंगाराम ठाकरे, फिरोज पटेल, ग्रामसेवक गुलाब साळवे, भरत म्हसणे, प्रकाश भागडे, सुरेश कडू, नंदलाल भागडे, सखाराम जोशी, सूर्यकांत भागडे, गटनेते दौलत बोंडे, विनोद भागडे, सुरेश भागडे, नंदू पाटेकर, लक्ष्मण ठाकरे, भागडे, मदन लहाणे, देवराम म्हसणे, योगेश भागडे, लक्ष्मण कडू, भगीरथ भगत, अशोक दुभाषे, भगीरथ भागडे, अमोल भागडे, शिवाजी लंगडे उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: The riot of seven wrestlers of Pimpri Sudrodin Uro