शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘तारांगण’ योजनेला प्रतिसाद

By admin | Updated: August 20, 2015 00:16 IST

चार शो आरक्षित : मुलांसाठी मिळणार सवलत; मुंबई-पुण्याचे प्रायोजक

नाशिक : महापालिकेच्या तारांगण प्रकल्पाला पुनर्जीवित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी आखलेल्या योजनेला थेट मुंबई-पुण्यातील प्रायोजकांकडून प्रतिसाद लाभत असून, आतापर्यंत चार शो आरक्षित झाले आहेत. १६ वर्षांखालील मुलांसाठी सवलत देण्याचाही निर्णय महापालिकेने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचा ‘तारांगण’ प्रकल्प बंद स्थितीत पडून आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने उभारलेल्या या तारांगण प्रकल्पाकडे नाशिककरांनी पाठ फिरविल्याने महापालिकेला त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर खर्च करावा लागतो. दरम्यान, महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर जीवनकुमार सोनवणे यांनी आधी कालिदास कलामंदिराच्या समस्यांकडे लक्ष दिले. त्यानंतर बंद स्थितीत असलेल्या ‘तारांगण’ प्रकल्पाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून योजना आखली. या योजनेनुसार, शहरातील कुणाही व्यक्तीचा वाढदिवस असेल त्याने तारांगणचे शो प्रायोजित करावेत. एका शोसाठी ५ हजार रुपये मोजल्यास अथवा दिवसभरातील चार शोचे २० हजार रुपये दिल्यास दिवसाला सुमारे ४०० विद्यार्थी तारांगणचा आस्वाद घेऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना सदर शो दाखविले जाणार असून, त्यांची निवड महापालिका करणार आहे. १६ वर्षांखालील मुलांसाठी सवलत योजना असून जे लोक आपल्या वाढदिवशी तारांगणचे शो प्रायोजित करतील त्यांची नावे तारांगणमधील इमारतीत डिस्प्ले केली जाणार आहेत. महापालिकेच्या या योजनेला मुंबई-पुण्यातील लोकांनी प्रतिसाद दिला असून, दि. २२ रोजी अविनाश शिरोडे (नाशिक), दि. २३ रोजी सोमनाथ पाटील (मुंबई), दि. २९ रोजी सुनील साबळे आणि दि. १ सप्टेंबर रोजी श्रीमती पवित्रा तुषार पगार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शो प्रायोजित करत आरक्षित केले आहेत. (प्रतिनिधी)