कुंदेवाडीमार्गे निऱ्हाळे बस सुरू झाल्याने समाधान

By Admin | Updated: August 1, 2014 01:12 IST2014-07-31T22:13:20+5:302014-08-01T01:12:48+5:30

कुंदेवाडीमार्गे निऱ्हाळे बस सुरू झाल्याने समाधान

Resolve due to bus stop through Kundewadi | कुंदेवाडीमार्गे निऱ्हाळे बस सुरू झाल्याने समाधान

कुंदेवाडीमार्गे निऱ्हाळे बस सुरू झाल्याने समाधान

 

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे येथे सिन्नर आगाराने कुंदेवाडीमार्गे सिन्नर -निऱ्हाळे बस सुरू केली आहे. सकाळी सात वाजता ही बस सुरू करण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलीस पाटील शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या पहिल्या बसचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच सुनीता जाधव, उपसरपंच शशिकांत केकाणे, सुभाष यादव, राजेंद्र वाघ, सोपान काकड, विठ्ठल वाघ, प्रकाश दराडे, देवीदास वाघ, शांताराम केकाणे आदि उपस्थित होते. प्रवाशांनी आपल्या दैनंदीन प्रवासात खासगी वाहनाऐवजी महामंडळाच्या बसचा वापर करण्याचे आवाहन पोलीस पाटील शिंदे यांनी यावेळी केले. निऱ्हाळे - खंबाळे - मुसळगाव -कुंदेवाडी हा रस्ता तीन वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात आला आहे. चांगला रस्ता असतानाही यापूर्वी या मार्गावर एकही बस सुरु नव्हती. त्यामुळे यामार्गे सकाळी ७ वाजता एक बस सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
त्या मागणीची दखल घेऊन सिन्नर आगार व्यवस्थापक दिलीप जाधव यांनी ही बस सुरु केली आहे. यामुळे निऱ्हाळे, फत्तेपूर, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, सुरेगाव, गुलापूर, खंबाळे, दातली, मुसळगाव, कुंदेवाडी आदि गावांतील विद्यार्थी व कामगार प्रवाशी वर्गाची गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Resolve due to bus stop through Kundewadi