शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:17 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून खंडित करण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : महावितरणच्या कारभारावर ताशेरेआरोग्य केंद्रातील उपकरणेदेखील विजेअभावी बंद पडली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकºयाचे वीज बिल माफ करण्यात यावे असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. महावितरण कंपनीकडून नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जात नाही, त्याचबरोबर नवीन वीजजोडणी दिली जात नसल्याने ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी महावितरण कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभीच सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून खंडित करण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वीज नसल्यामुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत असून, रुग्णांचेही हाल होत आहे. त्याचबरोबर आरोग्य केंद्रातील उपकरणेदेखील विजेअभावी बंद पडली आहेत, तर विविध प्रकारच्या लसी खराब होण्याची शक्यता निर्माण झाल्याची बाब आरोग्य सभापती यतिन पगार, आत्माराम कुंभार्डे आदींनी मांडली. एकीकडे नियमित वीज बिल भरणाºया शेतकºयांचा वीजपुरवठा सुरू केला जात नाही, दुसरीकडे नादुरुस्त ट्रान्सफार्मर महिनोनमहिने दुरुस्त केले जात नाही. कृषी कामासाठी वीजजोडणी दिली जात नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी करून अगोदरच शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला असताना त्याला दिलासा देण्याऐवजी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांचे वीज बिल माफ करण्यात यावे, असा ठराव मांडण्यात येऊन त्याला अनुमोदन देण्यात आले. यावेळी महावितरणच्या अधिकाºयांनी आपली बाजू मांडतांना अवकाळी पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून, दहा ते बारा हजार विजेचे पोल जमीन दोस्त, तर शेकडो ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले असल्याची माहिती दिली. वीज कंपनीकडे निधी नसून निधी उपलब्ध झाल्यास कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर जिल्हा विकास निधीतून वीज कंपनीला वाढीव निधी मिळवून दिल्यास कामे लवकर करता येतील, असे सांगितले. त्यावर जिल्हा नियोजन समितीकडून वाढीव निधी मिळण्यासाठी ठराव करण्यात आला.शेतकºयांना रब्बीच्या कांद्याला पाणी द्यायचे आहे, परंतु विजेअभावी ते शक्य नसल्याची तक्रार करतानाच, वीज कंपनी व त्यांचे ठेकेदार हे संगनमताने गैरव्यहार करीत असून, ट्रान्स्फार्मर नादुरुस्त झाल्यास ४८ तासांच्या आत ते बदलून द्यावे, अशी महावितरणची तरतूद आहे. परंतु त्याचे पालन होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. ज्याप्रमाणे वीज बिल न भरणाºया अथवा अनधिकृत वीजजोडणी केलेल्या शेतकºयावर वीज कंपनी कारवाई करते, त्याच धर्तीवर ट्रान्सफार्मर ४८ तासांत न बदलणाºया वीज कंपनीच्या अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद