शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तलावात मूर्ती विसर्जनास विरोध

By admin | Updated: September 5, 2014 00:32 IST

तलावात मूर्ती विसर्जनास विरोध

सिडको : विल्होळी, तालुका नाशिक येथील लघु तलावात गणपती विसर्जन करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत गावालगत ३० दसलक्षघनफूट क्षमतेचा तलाव असून, सदर तलावात सिडको, इंदिरानगर, गरवारे, पाथर्डी फाटा, अंबड यांसह परिसरातून गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनासाठी भाविक येतात. तथापि सदर तलावातून मागील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात गाळ, मुरुम इत्यादींचे अनधिकृत खोदकाम केल्याने खड्डे झालेले आहेत. भाविकांना सदर खड्ड्यांचा अंदाज नसल्यामुळे दरवर्षी दोन-तीन भाविकांचा बुडून मृत्यू होत आहे. नुकताच विल्होळी येथील शुभम मोतीराम भावनाथ या १२ वर्षीय शालेय बालकाचा सदर खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.गणपती विसर्जन काळात मोठ्या प्रमाणात भाविक गणपती विसर्जनासाठी गर्दी करीत असल्याने पोलीस व ग्रामरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. तसेच भाविक मोठ्या प्रमाणात निर्माल्य तलावात टाकत असल्याने जलप्रदूषण होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता गेल्या १५ आॅगस्टच्या ग्रामसभेवर सदर तलावात गणेश विसर्जन करू न देण्याबाबत ठराव पारित करण्यात आलेला आहे. दरम्यान, याबाबत विल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच विल्होळी तालुका पोलीस ठाणे आदिंना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सरपंच चंद्रभागा डांगे, उपसरपंच नामदेव भावनाथ, बाजीराव गायकवाड, भास्कर थोरात, बबन गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)