शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांचे आरक्षण ठरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:50 IST

नाशिक : जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रासाठीच्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ११ तालुक्यांतील ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी गुरुवारी (दि.२८) आरक्षण सोडत त्या-त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात आली. ८१० पैकी ४२९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले असून ३८१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आता या आरक्षणामध्ये स्त्री की पुरुष याचा फैसला येत्या ३ फेब्रुवारीला होणार आहे.

ठळक मुद्देसरपंचदासाठी सोडत : ४२९ सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित, स्त्री-पुरूषचा फैसला ३ फेब्रुवारीला

नाशिक : जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रासाठीच्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ११ तालुक्यांतील ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी गुरुवारी (दि.२८) आरक्षण सोडत त्या-त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात आली. ८१० पैकी ४२९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले असून ३८१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आता या आरक्षणामध्ये स्त्री की पुरुष याचा फैसला येत्या ३ फेब्रुवारीला होणार आहे.

जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला होता. त्यातील उमराणे (ता. देवळा) ग्रामपालिकेची निवडणूक सरपंचपद लिलाव प्रकरणामुळे रद्दबातल ठरविण्यात आली तर ५५ ग्रामपालिका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी गेल्या १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले होते. मात्र, सरपंचपदासाठी आरक्षण सोडत निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल लागले पण सरपंचपदाची सूत्रे कुणाच्या हाती जातात याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. ती उत्कंठा गुरुवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमुळे संपुष्टात आली. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ३८५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर केले जाणार होते. मात्र, पेठ, सुरगाणा, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या पूर्णत: अनुसूचित क्षेत्रासाठीच्या तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींचे आरक्षण वगळून उर्वरित ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी गुरुवारी आरक्षण काढण्यात आले. त्या-त्या तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली हे आरक्षण काढताना लहान बालकांची मदत घेण्यात आली.या आरक्षण सोडतीत ४२९ ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले असून ३८१ सरपंचपद हे राखीव असणार आहेत. गुरुवारी १५ जानेवारी रोजी झालेल्या ६२० ग्रामपंचायतींबरोबरच पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या १९० सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीही आरक्षण जाहीर करण्यात आले. आता या आरक्षणांमधून महिलांसाठीचे आरक्षण येत्या ३ फेब्रुवारीला काढण्यात येणार असून त्यावेळी गावकारभारी कोण, याचा अंतिम फैसला होणार आहे.तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या व आरक्षणतालुका संख्या सर्वसाधारण राखीवदिंडोरी १७ १० ०७इगतपुरी ३२ १८ १४निफाड ११९ ६० ५९सिन्नर ११४ ६३ ५१येवला ८९ ४८ ४१मालेगाव १२५ ६४ ६१नांदगाव ८८ ४५ ४३चांदवड ९० ४७ ४३बागलाण ८२ ४४ ३८देवळा २० १२ ०८नाशिक ३४ १८ १६सत्तांतरामुळे नव्या चेहऱ्यांना संधीजिल्ह्यात झालेल्या ६२० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तांतरे झालेली आहेत. प्रस्थापितांना धक्के देत मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत अनेक ग्रामपंचायतीत तरुणांच्या हाती सत्ता गेली आहे. यंदा प्रथमच सरपंचपदासाठीची निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीनंतर होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांकडून जोरदार लढाई लढली गेली. प्रत्येकजण सरपंचपद प्राप्त होण्याच्या ईर्षेनेच लढला. सत्तांतरामुळे अनेक ठिकाणी नवीन चेहरे निवडून आले असून गावकारभारी होण्याची संधी नव्या चेहऱ्यांना मिळण्याचा योग चालून आला आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.अजूनही टांगती तलवार कायमसरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाले असले तरी त्यातील ५० टक्के सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गातील महिलांसाठी प्रांत स्तरावर येत्या ३ फेबु्वारीला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी महिलाराज येतो, ह्याचा फैसला ३ फेब्रुवारीलाच होणार असून तोपर्यंत इच्छुकांच्या सरपंचपदाच्या स्वप्नांवर टांगती तलवार कायम असणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक