शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन : संसर्ग टाळण्यासासाठी हॅण्डवॉश व सॅनिटायझर युनिटची केली निर्मिती नळाला स्पर्श न करताही हात धुणे होणार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 02:02 IST

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने वारंवार हात साबनाने व पाण्याने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, बऱ्याच खासगी अथवा शासकीय आस्थापनांची कार्यालये अथवा कारखान्यांच्या ठिकाणी हात धुण्यासाठी एकाच ठिकाणी साबण आणि नळाची व्यवस्था केलेली असते.

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने वारंवार हात साबनाने व पाण्याने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, बऱ्याच खासगी अथवा शासकीय आस्थापनांची कार्यालये अथवा कारखान्यांच्या ठिकाणी हात धुण्यासाठी एकाच ठिकाणी साबण आणि नळाची व्यवस्था केलेली असते. अशाप्रकारामुळे संसर्गाला आळा बसण्याऐवजी उलट संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिकमधील पंचवटी भागातील एका व्यावसायिकाने पाण्याच्या नळाला व साबणाच्या द्रवाला कोणताही स्पर्श न करता हात धुण्याची यंत्रणा (हॅण्डवॉश स्टेशन युनिट) विकसित केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत होणार आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी पंचवटीतील व्यावसायिक संदीप लोंढे यांनी उच्च दर्जाचे मोबाइल हॅण्डवॉश स्टेशन युनिट विकसित केले असून, या उपकरणामुळे कोरोना विरोधातील लढ्यालाही बळ मिळणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेकडून कोरोनाविरोधात लढा सुरू असून, या संशोधनामुळे नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. शहरातील विविध रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कम्पाउंड गेट, भिंती आदींना ठिकाणांना व्यक्तीचा अनेकदा स्पर्श होतो. अशावेळी हातांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोबाइल हॅण्डवॉश स्टेशन युनिटचा वापर होऊ शकतो असा दावा संदीप लोंढे यांनी केला आहे. या उपकरणाद्वारे पाण्याचा वापर कमी प्रमाणात होत असून, त्याची वाहतूक करणेही सोयीचे असल्याचने विविध खासगी व शासकीय आस्थापनांसोबत कारखाने व विविध धामिक स्थळांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरही हातांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे उपकरण अतिशय फायदेशीर ठरणार असल्याचा दावा संदीप लोंढे यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या