नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: July 23, 2014 00:25 IST2014-07-22T23:48:28+5:302014-07-23T00:25:03+5:30

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी चालू अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्याची मागणी

Request for Railway Minister for Nashik-Pune Road | नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन

नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन

नाशिकरोड : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी चालू अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.
गौडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी. तसेच पुढील वर्षी नाशिक येथे सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर जलद गाड्यांना नाशिक थांबा मिळावा, तसेच पश्चिम व मध्य रेल्वे जोडण्यासाठी नाशिक-वापी या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्यात
यावी.
नाशिककरांसाठी मुंबईला दररोज ये-जा करण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस ही महत्त्वाची प्रवासी गाडी असल्याने बोगी वाढवून द्यावी, मनमाड-कुर्ला राज्यराणी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Request for Railway Minister for Nashik-Pune Road