शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण अधिकाऱ्याच्या खुर्चीला निवेदन

By admin | Updated: September 6, 2016 22:51 IST

शेतकरी संघटनेची गांधीगिरी : खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

 येवला : खंडित वीजपुरवठा, खराब झालेले विद्युत जनित्र, लोंबलेल्या वीजतारा, बिलवसुलीवरून विद्युत रोहित्रासाठी अडवणूक यासारख्या समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी संघटना नेते संतुपाटील झांबरे, शेतकऱ्यांसह वीज मंडळाच्या कार्यालयात गेले असता वीज मंडळाचे सक्षम अधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपअभियंत्याच्या खुर्चीला निवेदन चिटकविले.दरम्यान मनमाडचे कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली हे बघून कार्यकारी अभियंता यांनी प्रतिसाद दिला आणि कार्यालयात उपस्थित असलेले येवला शहर विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांना फोनवरून शेतकरी संघटनेशी चर्चा करून तीन दिवसात शेतक-यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी पत्र देण्यास सांगितले त्याप्रमाणे शेतकरी संघटनेला पत्र देण्यात आले. शेतकरी संघटनेच्या निवेदनात गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाशी झुंज देत आहे, काहींनी आपली जीवनयात्रा संपवली. पाऊस नसल्याने कित्येक शेतकऱ्यांनी विजेच्या पंपाचे बटनसुद्धा दाबले नाही मग बिल तयार कसे झाले? असा प्रश्न उपस्थित केला.यंदा सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर मोठ्या प्रमाणावर खर्च करून रब्बीची मका, सोयाबीन, बाजरी, तूर यासारखी पिके उभी केली परंतु पीक ऐन भरात असताना पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हैराण झाला असून या पिकांना पाणी न मिळाल्यास हातचे पीक जाण्याचे संकट दिसत असल्याने पाऊस आणि काही ठिकाणी पाटामुळे विहिरीत जे पाणी आहे ते द्यायचे तर वीजमंडळाचा हा खेळ, विहिरीत पाणी दिसत असून पिकाला पाणी देते येईना, अशी परिस्थिती वीज मंडळाने तयार केली आहे.वीजपुरवठा खंडित राहणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलून मिळण्यासाठी वीजबिलाची सक्ती करणे, मेंटेनन्सची कामे करणे यासाठी आज शेतकरी संघटना नेते, संतुपाटील झांबरे, महिला आघाडीच्या संध्या पगारे, बाळासाहेब गायकवाड, प्रभाकर भोसले, भीमराज गायकवाड, चंद्रभान जाधव, कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, नितीन इंगळे, पांडुरंग गायकवाड, बबन झांबरे, संतोष कदम, रायगड ग्रुपचे नारायण गायकवाड, अरविंदगिरी गोसावींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.(वार्ताहर)