शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

मागील दाराने रेडीरेकनरच्या दरात वाढ

By admin | Updated: January 2, 2015 00:41 IST

घरे महाग होणारच : तळटीपेमधील तरतुदींमुळे वाढणार भुर्दंड; ‘कही खुशी कही गम’चे वातावरण

नाशिक : गेल्यावर्षी जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनर अवास्तव असल्याने नव्या वर्षात दरवाढ न करण्याचे आश्वासन काहीसे फोल ठरले आहे. बहुतांशी भागात दरवाढ ‘जैसे थे’ ठेवण्यात आली असले तरी रेडीरेकनरच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या तळटीप म्हणजे फुटनोटमध्ये काही जाचक तरतुदींचा समाविष्ट असल्याने बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणारच आहे. त्यामुळे नव्या वर्षात घर खरेदी महागणार आाहे. क्रेडाईने यासंदर्भात ‘कही खुशी कही गम’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना पुन्हा शासनाकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे.गेल्यावर्षी राज्यशासनाने सरकारी बाजारमूल्याच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने गृहनिर्माण क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला होता. त्यामुळे नव्या वर्षात तरी दरवाढ करू नये, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दरवाढ न करता नाशिकरांना दिलासा दिला जाईल असे स्पष्ट केले होते. १ जानेवारीस रेडीरेकनरचे दर घोषित होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकच नव्हे, तर नागरिकांचे लक्ष लागून होते. परंतु नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. मुंबई नाका, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पाथर्र्डी मार्ग, मखमलाबाद या भागांत दरवाढ असली तरी आनंदवल्ली, गंगापूररोडसारख्या भागांना वगळण्यात आले आहे. क्रेडाईच्या वतीने यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना अध्यक्ष जयेश ठक्कर आणि अविनाश शिरोडे यांनी सांगितले की, गेल्यावर्षी अवास्तव दरवाढ करण्यात आल्यानंतर आता यावर्षी कॉलेजरोड गंगापूररोड, आनंदवल्लीसह अन्य अनेक भागांत दरवाढ झालेली नाही. गेल्यावर्षीचे दर यंदा कायम असल्याने जैसे थे परिस्थिती आहे. शहरातील सर्व आमदार आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो; परंतु त्यातून दिलासा मिळणार नाही, अशी व्यवस्था अधिकाऱ्यांनी केली आहे. गेल्यावर्षी जे तीस ते चाळीस टक्के दरवाढ शासनाने केली होती. तितकी वास्तविक किंमत होण्यासाठी दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिकच तोपर्यंत चढ्या दराने घर खरेदी करावे लागणार आहे. याशिवाय गेल्यावर्षी फुटनोटमधील तरतुदींमुळे गोेंधळ उडाला होता.