शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग घोटाळ्याप्रकरणी ४३ लाखांची वसुली ५३ लाखांचा एकूण घोटाळा, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस,

By admin | Updated: December 30, 2014 00:16 IST

आरोग्य विभाग घोटाळ्याप्रकरणी ४३ लाखांची वसुली ५३ लाखांचा एकूण घोटाळा, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस,

 नाशिक : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले प्रोत्साहन भत्ते व वेतनवाढी यामुळे झालेल्या सुमारे ५३ लाखांच्या घोटाळ्यातील ४३ लाखांची वसुली करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. विशेष म्हणजे यासंदर्भात सर्वांत आधी वृत्त दै. लोकमतने २५ डिसेंबरच्या अंकात ‘आरोग्य विभागत लाखोंचा घोटाळा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्र्यंबकेश्वरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत एक २४ पानी सविस्तर अहवालाच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे सादर केला होता. त्यात १०९ कर्मचाऱ्यांकडून अशी वसुली प्रस्तावित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आल्याचे समजते. याबाबत शुक्रवारी (दि.२६) सुखदेव बनकर यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सोपविली होती. आरोग्य विभागातील वर्ग दोन व वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आदिवासी भागात काम केल्याचे प्रोत्साहन भत्ते आणि वेतनवाढी घेऊन जिल्हा परिषदेचा व पर्यायाने शासनाच्या निधीचा विर्पयास केला होता. त्यामुळे अशा सुमारे १०९ कर्मचाऱ्यांकडूनही लाखोंची वसुली प्रस्तावित करण्याचा अहवाल त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी प्रमिला जाखलेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना दिलेल्या अहवालात नमूद केल्याचे समजते. त्यामुळे या लाखोंच्या घोटाळ्यातील सुमारे ४३ लाखांची वसुली संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याची माहिती सुखदेव बनकर यांनी दिली. तसेच अन्य कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या घोटाळ्याच्या मुळाशी गेल्यास घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता काही कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)