शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप प्रभाग रचनेला आयोगाकडून मान्यता

By admin | Updated: September 27, 2016 01:48 IST

महानगरपालिका निवडणूक : ७ आॅक्टोबरला आरक्षण सोडत; प्रभाग रचनेचे चित्र होणार स्पष्ट

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगानेही मान्यतेची मोहोर उमटविली आहे. आता येत्या ७ आॅक्टोबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढली जाणार असून, त्याचवेळी प्रभाग रचनेचे चित्र बव्हंशी स्पष्ट होणार आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीमार्फत दि. १२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने सदर प्रस्तावाची तपासणी करत महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सदरचा प्रस्ताव आयोगाला सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर आयोगाकडून दि. २३ सप्टेंबरपर्यंत मान्यता दिली जाणार होती. त्यानुसार, निवडणूक आयोगाने त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे. आता दि. ७ आॅक्टोबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना दि. १० आॅक्टोबरला आयोगाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येऊन अंतिम प्रभाग रचना २५ नोव्हेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. ७ आॅक्टोबरला आरक्षित जागांसाठी सोडत काढताना प्रभागांचे नकाशे, सीमांकने दर्शविली जाणार असल्याने त्याचवेळी प्रभागाची रचना स्पष्ट होणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेत गोपनीयता राखण्यात आली असली तरी ती फुटल्याचा आणि त्यात भाजपाने हस्तक्षेप केल्याचा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केला आहे. रचनेची माहिती बाहेर पडली असली तरी अधिकृत रचनेबाबतची उत्सुकता लोकप्रतिनिधी व इच्छुकांमध्ये कायम आहे. (प्रतिनिधी)