शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाला मान्यता, मात्र मनपा कर्मचा-यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:40 IST

नाशिक- महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने बुधवारी (दि. १४) मान्यता दिली असली तरी शासनातील इतर समकक्षपदांपेक्षा अधिक वेतन देण्यास शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे सहाव्या वेतन आयोगात शासकिय वेतनश्रेणीपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे दहा टक्के अतिरीक्त वेतन घेणा-यांची आता मोठी अडचण झाली आहे.

ठळक मुद्देवेतनवाढीचा प्रस्ताव शासनाने फेटाळला: कायदेशीर लढाईची तयारी सुरू

नाशिक- महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने बुधवारी (दि. १४) मान्यता दिली असली तरी शासनातील इतर समकक्षपदांपेक्षा अधिक वेतन देण्यास शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे सहाव्या वेतन आयोगात शासकिय वेतनश्रेणीपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे दहा टक्के अतिरीक्त वेतन घेणा-यांची आता मोठी अडचण झाली आहे.त्यातच सुधारीत वेतन आयोग देताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची स्थिती लक्षात घेऊन वेतन आयोग लागु करण्याचे आदेश देण्यात आल्याने सुधारीत वेतन कधी लागु होणार हे देखील अस्पष्ट आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.नाशिक महापालिकेत सुमारे साडे चार हजार अधिकारी कर्मचारी असून त्यांच्या या शासनाच्या आदेशाकडे नजरा लागुन होत्या. सहावा वेतन आयोग लागू करताना महापालिकेच्या कर्मचा-यांना नियमीत शासकिय कर्मचा-यांच्या पदसमकक्ष वेतनश्रेणी पेक्षा अधिक सुमारे दहा टक्के वेतन देण्यात आले आहेत.यांसदर्भात महापालिकेने निर्णय घेतल्यानंतर तत्कालीन राज्य शासनाची मान्यता घेण्यात आली होती. मात्र, गेल्या राज्य सरकारने राज्यातील महापालिकांना सातवा वेतन आयोग लागु करताना त्यांना शासकिय पद समकक्ष वेतनश्रेणीच देण्याचा निर्णय घेऊन तो सर्व महापालिकांना लागु केला. नाशिक महापालिकेने सातवा वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय घेतला खरा परंतु सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीवर आधारीत तो लागु करण्याचा ठराव केला.माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यात शासकिय आदेशानुसार आणि महासभेच्या ठरावानुसार वेतनश्रेणी लागु करण्यास विकल्प दिला होता. त्यावर आता बुधवारी (दि.१४) नगरविकास खात्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी महापालिकेला पत्र पाठविले आहे. त्यांनी सातवा वेतन आयोग लागु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देताना शासनाकडील पदसमकक्ष पदांपेक्षा अधिक वेतन देता येणार नाही हे स्पष्ट केले असून यासंदर्भात तसे आयुक्तांना ३० दिवसांच्या आत प्रमाणीत करून मागितलेआहे.त्याच बरोबर कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडल्याने ती स्थिर सावर करूनच वेतन आयोगातील वेतनश्रेणी प्रत्यक्ष लागु करण्याबाबतही आयुक्तांना आदेशीत केले आहे.महापालिकेतील सुमारे ७० टक्के कर्मचाऱ्यांची या आदेशामुळे अडचण होणार आहे. त्यांना एकतर नव्या वेतनश्रेणीनंतर जेमतेम वेतनवाढ मिळेल अन्यथा आहे त्या वेतनापेक्षा कमी मिळण्याची भीती कर्मचारी व्यक्त करीत आहेत. म्युनिसीपल कर्मचारी सेनेने शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे जाहिर केले आहे तर काही जणांनी शासन आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.शासनाचे वेतन आयोगाबाबत दिलेले आदेश प्राप्त झाले आहेत. त्यासंदर्भात वित्त अधिका-यांकडून माहिती मागितली आहे. सर्व आर्थिक स्थिती आणि शासनाच्या आदेशाचा विचार करून याबाबत निर्णय घेण्यात येईल. - कैलास जाधव आयुक्त, महापालिकामहापालिकेने यापूर्वी दहा टक्के वेतनवाढ देताना शासनाकडून मान्यता घेतली आहे. आता नव्या वेतनश्रेणीमुळे मनपा अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वेतनात तफावत स्येणार आहे. यांसदर्भात मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यात येईल.- प्रविण तिदमे, अध्यक्ष म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेना.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार