शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान

By admin | Updated: August 22, 2014 00:34 IST

नाशिक विभागात करंजगाव प्रथम

नाशिक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान पुरस्काराचा निकाल विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जाहीर केला असून, त्यात विभागातून निफाड तालुक्यातील करंजगाव प्रथम, धुळे जिल्ह्यातून नेवाडे ग्रामपंचायत द्वितीय, तर नाशिक तालुक्यातून सिद्धपिंप्री व संगमनेर तालुक्यातून निमज या ग्रामपंचायतींना विभागून तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.आयुक्त एकनाथ डवले यांनी नुकतीच या ग्रामपंचायतींची पाहणी केली होती. त्यानंतर हा निकाल घोषित केला आहे. विभागातून प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीला दहा लाख, तर द्वितीय आणि तृतीय ग्रामपंचायतींना अनुक्रमे आठ व सहा लाखांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यातही निमज व सिद्धपिंप्री ग्रामपंचायतींना सहा लाखांचे पारितोषिक विभागून असल्याने प्रत्येकी तीन लाखांची रक्कम मिळणार आहे. (पान ७ वर)त्याचप्रमाणे विशेष पुरस्कारांच्या यादीतही करंजगाव व सिद्धपिंप्रीचा नंबर लागला आहे. पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनासाठी दिला जाणारा स्व. वसंतराव नाईक विशेष स्मृती पुरस्कार नेवाडे (शिंदखेडा, धुळे) या ग्रामपंचायतीला, तर कुटुंबकल्याण कार्यक्रमासाठी दिला जाणारा स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार पिंपळी (प्र.) (ता. अंमळनेर) ग्रामपंचायतीस, तर पन्नास हजार रुपयांचा सामाजिक एकतेसाठी दिला जाणारा बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार सिद्धपिंप्री ग्रामपंचायतीस जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रकमेचा साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळेचा पुरस्कार नरवेल (ता. मुक्ताईनगर, जळगाव) ग्रामपंचायतीस, तर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार करंजगाव ग्रामपंचायतीस जाहीर करण्यात आला आहे, तर दहा लाखांचा शाहू-फुले-आंबेडकर स्वच्छ दलितवस्ती विकास व सुधारणा पारितोषिक विभागून फुलगाव (भुसावळ, जळगाव) व निमगाव गांगडा (कर्जत, अहमदनगर) या ग्रामपंचायतींना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)