शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

मायको फोरमतर्फे रांगोळी प्रदर्शन

By admin | Updated: September 12, 2016 01:37 IST

प्रमोद आर्वी यांनी रांगोळीतून दिला सामाजिक संदेश

 नाशिक : सेव्ह अर्थ, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळजन्य परिस्थिती, मुलगी वाचवा, अन्न वाया घालवू नका हे आणि असे विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या कलाकार प्रमोद आर्वी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित रांगोळी प्रदर्शनात रेखाटल्या आहेत. चित्रकलेचे त्याचप्रमाणे रांगोळीचे कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता बोटांच्या अलगद स्पर्शाने मालेगाव (संगमेश्वर) येथील कलाकार प्रमोद आर्वी यांनी रांगोळीच्या उत्कृ ष्ट कलाकृती साकारल्या आहेत. मायको एम्प्लॉईज फोरम यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी कार्यशाळा तसेच रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १०) अश्विननगर येथील मायको फोरम संस्थेच्या सभागृहात आयोजित या प्रदर्शनाचे नगरसेविका शीतल भामरे आणि संजय भामरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या प्रदर्शनांतर्गत रांगोळी कलाकार प्रमोद आर्वी यांनी रेखाटलेल्या विविध रांगोळ्या या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. तसेच संस्कार भारती, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून कसे साकाराचे याबाबतही आर्वी कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनात ११ कलाकारांच्या मार्फत २५ ते ३० किलो रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. या रांगोळ्या साकारण्यासाठी रेणूका पाटणकर, मोनाली बच्छाव, श्रध्दा बागुल, गायत्री निकम, मीनल जाधव, पुजा बच्छाव, राधिका महाले, दीपाली देशमुख, प्रिया मोरे, मोहिनी इनामदार आदि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिकसह मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर याठिकाणी रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला सादर केली आहे. साताऱ्याला झालेल्या स्पर्धांमध्ये दोन वेळा सहभागी होत पाचवा तर सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. नाशिकमध्ये फारशी माहिती नसलेल्या लेक रंग आणि पिग्मेंट रंगांपासून रांगोळी रेखाटण्यात आर्वी यांचा विशेष हातखंडा आहे. रांगोळी रेखाटनातून निसर्गचित्र, व्यक्तिचित्र तसेच विशिष्ट विषयावर आधारित रांगोळी रेखाटून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आर्वी करत असतात. गुरुवारी (दि. १५) सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी भगवान सोनवणे, मोहनदास पाटील, प्रशांत लोणारी, सतीश राजकोर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)