शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 7:03 PM

सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील सूर्यभान गडाख शैक्षणिक संकुलात न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दहावीच्या २०१२-१३ च्या दहावी वर्गाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा पार पडला.

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथील सूर्यभान गडाख शैक्षणिक संकुलात न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दहावीच्या २०१२-१३ च्या दहावी वर्गाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा पार पडला.शाळेचे दिवस संपले की प्रत्येक जण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात धाव घेतो. मात्र ज्या शाळेमध्ये आपण शिकलो लहानाचे मोठे झालो, ज्या शाळेने आपल्याला घडविले आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र दिले त्याच शाळेत भेट पुन्हा नव्याने म्हणत शाळेची नवीन इमारत बघण्यासाठी तसेच आपली शाळा, गुरुजनांशी असलेले ऋणानुबंध आणखी बळकट करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले होते.सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्राचार्य राजेंद्र गडाख हे अध्यक्षस्थानी होते. प्रा. प्रवीण शेलार, संपत गडाख हे व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना येणाऱ्या प्रसंगांना आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर सामोरे जावे. इच्छाशक्तीच्या बळावर माणूस कोणतेही यश संपादन करू शकतो, असे सांगत प्राचार्य गडाख यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रतीक बेलोटे, आदित्य गव्हाणे, महेश हांडोरे, दीपक राऊत, धनंजय बेलोटे, प्रदीप थोरात यांनी मनोगत व्यक्त करत शाळेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.सुवर्णा हांडोरे हिने प्रास्ताविक केले. तर किरण खाडे याने सूत्रसंचालन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा भेट देण्यात आली. या मेळाव्यास रूपाली हांडोरे, महेश डुंबरे, प्रकाश कणकुसे, हर्षल यादव, समाधान सैंद्रे, किशोर थोरात, सचिन थोरात, ऋषिकेश डुंबरे, धनंजय थोरात, शुभम सैंद्रे, अजय डुंबरे आदी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा