शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचा एजंट पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: August 26, 2016 23:47 IST

लष्कर भरती फसवणूक प्रकरण

नाशिकरोड : राजस्थानच्या चौघा युवकांना बनावट कागदपत्रे व सही शिक्के मारून आर्टिलरी सेंटरमध्ये भरती केल्याचे दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानमधील एजंटाला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, तिघेजण फरार आहेत.राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील बलबीर रामचंद्र गुजर, सुरेशकुमार शिवचरण महंतो, सचिनकुमार किशनसिंह, तेजपाल मोतीराम चोपडा या चौघांनी व त्यांच्या नातेवाइकांनी आर्टिलरी सेंटरमध्ये भरती होण्यासाठी एका टोळीला पैसे दिले होते. त्यांनी दिलेल्या बनावट कागदपत्र व सही शिक्क्यावरून हे चौघेजण नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये गेल्या जुलै महिन्यात ट्रेनिंगसाठी दाखल झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये संशय आल्याने अधिक माहिती घेण्यात आली. त्यामध्ये राजस्थानच्या चौघा युवकांनी लष्करात दाखल होण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील लष्करी शिपाई गिरीराजसिंग घनश्यामसिंग चौहान याला अटक केली होती. वरील पाचही संशयितांची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. लष्करात भरती करण्यासाठी युवकांना खोटी कागदपत्रे व नियुक्तीपत्रे देणाऱ्या टोळीचा एजंट टेकचंद चितरराम मेघवाल (रा. मातोर, जिल्हा अल्वर, राजस्थान) याला उपनगर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेत शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता ११ दिवस (६ सप्टेंबर) पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एफ. इंगळे करत आहे. (प्रतिनिधी)