नाशिक जिल्ह्यात पावसाचा ओसरला जोर

By Admin | Updated: August 1, 2014 01:08 IST2014-07-31T22:54:45+5:302014-08-01T01:08:53+5:30

नाशिक जिल्ह्यात पावसाचा ओसरला जोर

Rainfall of rain in Nashik district | नाशिक जिल्ह्यात पावसाचा ओसरला जोर

नाशिक जिल्ह्यात पावसाचा ओसरला जोर

नाशिक : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर गुरूवारी (दि.३१) काहीसा ओसरल्याचे दिसून आले. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७६ टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास २ ते ५ हजार क्यूुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येईल,अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ६६३.३० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे- नाशिक-७०.६०, इगतपुरी-१३८, दिंडोरी-४४,, पेठ-१००, त्र्यंबकेश्वर-१२८, मालेगाव-१, नांदगाव-००, चांदवड-१६, कळवण-१८, बागलाण-८.२०, सुरगाणा-४०.७०, देवळा-२४, निफाड-३६.६०, सिन्नर-१४.२०, येवला-२५ असा एकुण ६६३.३० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळापासूनच पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारनंतर काही वेळ अधून-मधून पावसाने उघडीप घेतली. मात्र दिवसरभरात पावसाची कमी-अधिक स्वरूपात संततधार सुरूच होती. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापुर धरण ७६ टक्के भरल्याने धरणातून कधीही विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याने गोदा काठच्या परिसराला व गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Rainfall of rain in Nashik district