शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:47 AM

नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस ...

नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ७२४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. शहर परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान, नाशिसह मध्य महाराष्टÑात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अवघ्या ९ टक्क्यांवर आलेला धरणातील पाणीसाठा आता ३३.८५ टक्के इतका झाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेल्या पाणीकपातीचा फेरविचार होण्याचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच दारणा ३८.४१, नांदूरमधमेश्वर ५४.५७, गौतमी-गोदावरी २१.२९, भावली ३९.१२, मुकणे १२ तर कडवा ७.८७ टक्के भरले आहे.दरम्यान, जिल्ह्णात पावसाचा जोर अजूनही कायम असून, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत इगतपुरीत ५७८, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ३६३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (दि. ८) सकाळपासूनच या ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरी मध्यरात्री पूर काहीसा ओसरला आहे. हवामान खात्याने पुढील चार तासांत वर्तविलेली पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने यात्रेकरू, भाविकांना अडकून पडावे लागले. तर इगतपुरीमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली.कसारा घाटात वाहतूक संथकसारा घाटात काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे दगड येऊन पडल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून मंदगतीने सुरू आहे. महामार्ग पोलिसांच्या बंदोबस्तात येथील वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. या ठिकाणी रस्त्यावर आलेले दगड काढण्याचे काम सुरू होते.दोन टॅँकर्स झाले कमीजिल्ह्णात पावसाची सुचिन्हे दिसत असली तरी पाण्याची कमतरता कायम आहे. जिल्ह्णात अजूनही २९८ टॅँकर्सद्वारे गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नर आणि येवला येथे अनुक्रमे ६४ आणि ६१ चार छावण्या असून चांदवड, देवळा, मालेगाव तसेच नांदगाव येथे चारा छावण्या सुरू आहेत.२७ घरांचे नुकसान; चार जनावरे दगावलीपावसाचा सर्वाधिक फटका हा त्र्यंबकेश्वरला बसला असून, याठिकाणी १८ घरे कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा १४ टक्के झाला इतका वाढला असून, नांदूरमधमेश्वर मधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसाचा सर्वाधिक फटका त्र्यंबकेश्वर, पेठ, येवला आणि इगतपुरी यांना बसला असून, या चारही तालुक्यांमधून एकूण २७ घरांची पडझड झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक १८, पेठ, येवला येथे प्रत्येकी १ तर इगतपुरीत सात घरांचे नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वरला चार जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी