शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्तालूट करणारे जेरबंद

By admin | Updated: November 11, 2015 00:11 IST

एमआयडीसी पोलीस : गस्तीपथकाची कामगिरी

सिन्नर: रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांची लूट करणाऱ्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गस्तीपथकाने पाठलाग करून जेरबंद केले. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गस्तीपथकाने ही कामगिरी केली. यातील फरार चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहे. मनेगाव येथील छायाचित्रकार गणेश मधुकर करगड हे गुरेवाडी येथील आॅर्डर पूर्ण करून रात्री साडेआठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने मनेगाव येथील आपल्या घराकडे निघाले होते. रस्त्यात अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. करगड यांना धाक दाखवून या तिघा चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १ हजार आठशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर चोरटे त्यांच्याकडील दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान, एमआयडीसी पोलीस हद्दीत कामगारांचे पगार व बोनसच्या पार्श्वभूमीवर कामगारांची होणारी लूटमार लक्षात घेता पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन गस्तीपथक तैनात करण्यात आले आहे. करगड यांना चोरट्यांनी लुटल्यानंतर ते काय करावे या विचारात असतानाच घटनास्थळी एमआयडीसी गस्ती पथकाचे वाहन पोहचले. पोलीस हवालदार गौरव सानप, दत्तू खतीले, प्रवीण मासळे यांनी करगड यांची विचारपूस केली. त्यांनी घडलेली आपबिती सांगताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पोलीस वाहनात बसवून घेतले. चोरटे पसार झाले त्या दिशेने पोलिसांच्या गस्तीपथकातील वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला. नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ तीन चोरटे दुचाकीवरून पुढे जात असल्याचे करगड यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अडविले. चोरट्यांनी त्यांच्याकडील दुचाकी तेथेच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मदन मारुती पवार (३२) रा. खंबाळे हा संशयित चोरटा पोलिसांच्या ताब्यात सापडला. तर अन्य दोघेजण अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी पवार याच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अन्य त्याच्या एका साथीदाराला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरोधात रस्तालुटीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)