खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

By Admin | Updated: May 5, 2017 15:20 IST2017-05-05T15:20:29+5:302017-05-05T15:20:29+5:30

११ हजार तूर खरेदी, अद्यापही हजारो क्विंटल खरेदी बाकी

Purchase of money by farmers' hands' Turi ' | खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

नाशिक : जिल्ह्यात चार ठिकाणी सुरू असलेली तूर खरेदी २२ एप्रिलनंतर बंद करण्यात आल्याने अद्यापही जिल्ह्यातील ५ ते ६ हजार क्विंटल तूर खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, खळ्यात काढून ठेवलेली तूर दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांची नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारीपासून जिल्ह्यात येवला, नांदगाव, मालेगाव व बागलाण या चार तालुक्यांत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडच्या संयुक्त विद्यमाने तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तूर विक्री केंद्रे उभारण्यात येऊन १२२८ शेतकऱ्यांनी त्यांची ११४२० क्विंटल तूर विक्री केली त्यापोटी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून या १२२८ शेतकऱ्यांना ५०५० रुपये क्ंिवटल भावाने पाच कोटी ७६ लाख ७१ हजार रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली.

Web Title: Purchase of money by farmers' hands' Turi '