शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आता झाडे तोडण्यासाठी जनहित याचिका

By admin | Updated: October 9, 2015 23:06 IST

गंगापूररोडवासीयांचा निर्णय : उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पन्नास हजार पत्रे पाठविणार

नाशिक : रस्ता रूंदीकरणात बाधीत झाडे तोडू नये यासाठी दाखल झालेल्या पर्यावरणप्रेमींच्या याचिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता झाडे तोडण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय गंगापूररोड रस्ता विकास कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे उच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींना पन्नास हजार पत्रे पाठवून अपघाताला कारणीभूत असणारी झाडे तोडावी यासाठी साकडे घालण्याचेही ठरविण्यात आले.गंगापूर रस्ता विकास कृती समितीची बैठक शुक्रवारी सायंकाळी नंदनवन लॉन्स येथे झाली. उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, नगरसेवक विक्रांत मते आणि विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापालिकेने रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर रूंदीकरणात बाधीत होणारी झाडे तोडण्याची तयारी केली होती. केवळ जेहान सर्कल ते गंगापूर गाव या मार्गावरील साडेतीनशे झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने झाडे तोडण्यास केलेली मनाई आणि त्यानंतर घातलेल्या अटी-शर्ती तसेच विशिष्ट झाडे तोडण्यास नाकारलेली परवानगी यामुळे आजही गंगापूररोडचे रूंदीकरण पूर्ण झालेले नाही. तथापि, पर्यावरण रक्षण महत्त्वाचे की, नागरिकांचे जीवन असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करीत ही समिती स्थापन केली आहे. रूंदीकरणातील झाडे तोडण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी असे ठरवतानाच अपघात होत असल्याने झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी पन्नास हजार पत्रे न्यायमूर्तींना पाठवून ही पत्रे जनहित याचिका म्हणून दाखल करून घ्यावेत, असे मत व्यक्त केले. बैठकीस महेश हिरे, के.जी. मोरे, डॉ. श्याम अष्टेकर, सचिन मोरे, अशोक खुटाडे, शशिकांत टर्ले, वैशाली देवरे, संतोष गायकर, अ‍ॅड. पेखळे, संदीप फडतरे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)