शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

खरीप, रब्बीसाठी अनुदान द्यावे

By admin | Updated: July 28, 2014 00:42 IST

दुष्काळी स्थिती : सायाळे येथील शेतकऱ्यांची मागणी

सिन्नर : शासनाने दुष्काळी शेतकऱ्यांसाठी दिलेले नुकसानभरपाईचे अनुदान अद्याप मिळाले नाही. खरीप व रब्बी हंगामाचे निवेदन त्वरित देण्याची मागणी सायाळे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सन २०१२ - १३ या वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील अनुदान अद्याप प्राप्त झाले नाहीत. याबाबत येथील शेतकरी रोज तलाठी कार्यालयात चकरा मारुन कंटाळले आहेत. पाथरे येथील नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतही शेतकरी चकरा मारतात. मात्र अद्याप अनुदान प्राप्त झाले नसल्याचे तेथील अधिकारी सांगत आहेत. तालुक्याच्या पूर्वभागात सलग चौथ्या वर्षीही पाऊस झाला नसल्याने दुष्काळी स्थिती आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतीतील नऊ हंगाम पावसाअभावी वाया गेले आहे. त्याच उन्हाळ््यात गारपीट व वादळी पावसाने उभ्या असलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी रब्बी हंगामात जोरदार वादळी व अवकाळी पावसाने गहू, हरभरा व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाच्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र त्याच्या भरपाईचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे. शासनाकडे अनेकदा मागणी करूनही शासनाकडून अद्याप अनुदानाबाबत काहीही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनावर रतन गोरे, विजय शिंदे, मच्छिंद्र गोरे, सुशीला गोरे, रामभाऊ गवारे, गणपत शिंदे, सुंदराबाई शिंदे, योगेश शेळके, दादा बुरकुले, देवराम शेळके, भाऊसाहेब शेळके, योगेश शेळके आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)