शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामे हटविण्यासाठी खासगी मक्तेदाराला काम देण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: January 20, 2015 01:50 IST

बांधकामे हटविण्यासाठी खासगी मक्तेदाराला काम देण्याचा प्रस्ताव

नाशिक : ‘निधी नाही, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही मग करा खासगीकरण’, असा पर्याय प्रत्येक प्रश्नाला शोधणारी महापालिका आता अतिक्रमण निर्मूलनासाठीही ठेका देण्याचे घाटत असून, इमारतींच्या वरच्या मजल्यांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी खासगी मक्तेदाराला काम देण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी ठेका देण्याचा हा अजब फंडा सुचविल्याने अमूल्य क्लीनअप अथवा वाहने उचलण्याच्या ठेक्याप्रमाणे नागरिकांना गुंडगिरीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात असून, या प्रस्तावाला महासभेत सदस्यांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.खासगी ठेकेदारांमार्फत कामे करून घेण्याचा महापालिकेचा अनुभव फारसा चांगला नाही. अनेक खासगी ठेक्यांनी महापालिका बदनामच झालेली आहे. तरीही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चक्क अतिक्रमणे खासगी ठेकेदारामार्फत हटविण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. या प्रस्तावामुळे नागरिकांना जाचच अधिक होण्याची शक्यता आहे. विभागाच्या प्रस्तावानुसार, तळमजल्यावरील बांधकामे महापालिकेला हटविणे सहज शक्य होते, परंतु काही बांधकामे ही दुसऱ्या-तिसऱ्या अथवा त्याहून अधिक मजल्यांवर असल्याने आणि ती आर.सी.सी. सीमेंट कॉँक्रीट, लोखंडी गर्डर, चॅनल, जाळी आदि स्वरूपाची असल्याने ती हटविणे धोकादायक असते. शिवाय वरच्या मजल्यांवरील जोखमीच्या कामासाठी व अनधिकृत साहित्य हटविणे व वाहतुकीसाठी मनपाकडे पुरेसे मनुष्यबळही नाही आणि वाहनेही उपलब्ध नाहीत. मनपाच्या यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करावयाचे असल्याने अशावेळी खासगी ठेकेदारामार्फत सदरचे काम करून घेणे आवश्यक आहे. सदर ठेका निविदा पद्धतीने काढण्यात येणार असून, अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पुरेशी यंत्रसामुग्री व मनुष्यबळाची व्यवस्था संबंधित ठेकेदाराला करावयाची आहे. बांधकाम हटविताना काही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असणार आहे. ठेकेदाराकडून अनधिकृत बांधकामावरील साहित्य जप्त करण्यात आल्यानंतर ते त्याने स्वत:हून महापालिकेच्या गोडावूनमध्ये जमा करावयाचे आहे. अनधिकृत बांधकामे तोडण्याकरिता येणारा खर्च मात्र संबंधित मिळकत धारकांकडून वसूल करण्यात येणार आहे. सदर अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी वार्षिक खर्च सुमारे एक कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. सदरचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत ठेवला जाणार असून, त्याला सदस्यांकडून कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)