शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: February 11, 2015 01:57 IST

वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

नाशिक : जर्मन सरकारच्या अनुदानातून खतप्रकल्पावर ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (दि. ११) होणाऱ्या बैठकीत मांडला जाणार असून, या वीज प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे सहा लाख रुपये किमतीची ९९ हजार युनिट इतकी वीज मोफत मिळणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. जर्मन सरकारचे अनुदान आणि मक्तेदार यांच्याकडून प्रकल्प उभारणीसाठी खर्च होणार असताना महापालिकेला मात्र दरमहा सुमारे पाच लाख रुपये प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी संबंधित मक्तेदाराला मोजावे लागणार आहेत.जी.आय. झेड या जर्मन संस्थेमार्फत जर्मन सरकारच्या अनुदानातून कार्बन आणि मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी जर्मन सरकारने आठ लक्ष युरो म्हणजे सुमारे ६ कोटी ८० लाख रुपये अनुदान स्वरूपात देऊ केले आहे. त्यातील १.५ लक्ष युरो म्हणजे १ कोटी २५ लाख रुपये रक्कम महापालिकेच्या खात्यावर १० आॅक्टोबर २०१३ मध्येच जमाही करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षात महापालिकेला त्याचे सुमारे सहा लाख रुपये व्याजापोटीही मिळाले आहेत. दरम्यान, महापालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली असता त्यातील बंगलोरच्या मे. ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन सोल्यूशन्स या कंपनीने निविदेतील अटी-शर्तीनुसार काम करण्याची तयारी दर्शविली आहे. सदर प्रकल्पासाठी भांडवली गुंतवणूक जर्मन सरकारचे अनुदान आणि मक्तेदाराच्या खर्चातून होणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला दरमहा चार लाख ९४ हजार रुपये देखभाल-दुरुस्तीसाठी मोजावे लागणार आहेत. त्या बदल्यात महापालिकेला दरमहा ९९ हजार युनिट इतकी वीज मोफत प्राप्त होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मक्तेदाराला दरवर्षी राष्ट्रीय मूल्य निर्देशांकानुसार वाढही देण्यात येणार आहे. सदर प्रकल्प ३० मे. टन क्षमतेचा असून, मक्तेदारामार्फतच टाकून दिलेले अन्न आणि सार्वजनिक शौचालयातील मैला यांची वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचा वाहतुकीचाही खर्च वाचणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सदर प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेच्या खतप्रकल्पावर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर प्रकल्प दहा वर्षांच्या कालावधीकरिता चालविण्याकरिता देण्याबाबतचा तसा प्रस्ताव स्थायीवर मांडण्यात येणार आहे.