शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांकडून ‘फोन अ फ्रेण्ड’द्वारे प्रचार जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:53 IST

निवडणुकीच्या अंतिम पर्वात शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट उमेदवारांनी ठेवले आहे. त्यामुळे आता लॅँडलाइन तसेच भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवाराचे नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती करीत आहेत. तसेच निकटचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नातेसंबंधातील मतदारांना फोन करण्यास लावत असल्याने निवडणुकीची ही लढाई हातघाईवर आल्याचे अधोरेखित होत आहे.

नाशिक : निवडणुकीच्या अंतिम पर्वात शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट उमेदवारांनी ठेवले आहे. त्यामुळे आता लॅँडलाइन तसेच भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवाराचे नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती करीत आहेत. तसेच निकटचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नातेसंबंधातील मतदारांना फोन करण्यास लावत असल्याने निवडणुकीची ही लढाई हातघाईवर आल्याचे अधोरेखित होत आहे.प्रदीर्घ काळ ज्या नातेवाइकांचा आपल्याला कधीही फोन आलेला नसतो अशा नातेवाइकांकडून फोन येण्याचे प्रकारदेखील वाढू लागले आहेत. अमुक अमुक उमेदवार आपल्या तमुक-तमुकचा संबंधातला आहे. कधी काही मदत लागली तर भविष्यात आपल्याला हक्काने त्याच्याकडे जाता येईल. त्यामुळे यावेळी त्यालाच किंवा तिलाच मतदान करा, असेही फोन येण्यास प्रारंभ झाले आहेत. प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांकडून फोनचे हत्यार वापरले जात आहे.रेकॉर्डेडऐवजी प्रत्यक्ष संवादउमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून किंवा प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून गत काही निवडणुकांमध्ये रेकॉर्डेड कॉल येत असत. मात्र, असे बहुतांश रेकॉर्डेड कॉल कट करून टाकले जात असल्याचे अनुभव आल्याने प्रचार यंत्रणेमार्फत आता टेलिकॉलर्सद्वारे फोन केले जात आहेत. संबंधित टेलिकॉलर महिला प्रत्यक्ष मतदाराशी बोलून आपल्या उमेदवाराचे नाव, निशाणी सांगून २१ आॅक्टोबरला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूक