शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

By admin | Updated: June 24, 2014 00:25 IST

सिन्नर : रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

सिन्नर : जून महिन्यातील तिसरा आठवडा उलटला आहे. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. सलग चौथ्या वर्षीही पावसाने दगा दिल्याने यंदाही खरीप हंगाम होतो की नाही या चिंतेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रविवारपासून आर्द्रा नक्षत्र मोर वाहनावर येत आहे. या नक्षत्रात पाऊस झाला तरच खरिपाच्या पेरण्या शक्य आहे. तथापि, उशीर झाल्यास पेरण्या वाया जातील, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. तीन वर्षांत सुमारे खरीप, रब्बी व उन्हाळी असे नऊ हंगामांतून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील बागायती क्षेत्रात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन हाती आले नसल्याने त्यातच अवकाळीचा दणका बसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असतानाच यंदा चांगला पाऊस होऊन खरीप हंगामात बरकत मिळेल, या भोळ्या आशेवर शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागले होते. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतींची कामे जवळपास पूर्ण झाली असूून, शेतकरी पावसाची आकाशाकडे डोळे लावून वाट पहात आहेत. मात्र जून महिना कोरडा जाऊ लागल्याने खरिपाच्या आशा धूसर होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊसच पडत नसल्याने सिन्नर शहरासह तालुक्यातील बी- बियाणे, खते व औषधांची विक्री करणारे कृषी सेवा केंद्रांमधून अद्याप खरेदीला सुरुवात झाली नसल्याने ही दुकाने ग्राहकांअभावी ओस पडल्याची स्थिती आहे. यंदा बी-बियाणे व खतांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. मात्र शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने खते व बियाण्यांसाठी मोठा खर्च करण्यापेक्षा शेतीच करावी की नाही अशा मनस्थितीपर्यंत शेतकरी पोहोचले आहेत. खते व बियाण्यांच्या किमतीत सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. (वार्ताहर)