शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यानिमित्त येवल्यात मिरवणूक

By admin | Updated: September 12, 2015 22:51 IST

जिल्ह्यात उत्साह : दुष्काळाचे सावट; घरोघरी बैलांची पूजा

पोळ्यानिमित्त येवल्यात मिरवणूक जिल्ह्यात उत्साह : दुष्काळाचे सावट; घरोघरी बैलांची पूजा येवला : दुष्काळाची पार्श्वभूमी असली तरी येवला शहरात शनिवारी सायंकाळी ७ वाजता बैल पोळ्याची मिरवणूक बैलांची संख्या कमी असली तरी ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. येथील गंगादरवाजा भागात सर्व शेतकरी त्यांच्या सजवलेल्या बैलासह जमा झाले. अग्रभागी राजे रघुजीराजे शिंदे यांचे वंशज अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांचा डोक्यावर बाशिंग धारण केलेला मानाचा बैल होता. मानाच्या बैलाचा कासरा,भास्करराव शिंदे , शाहू शिंदे ,अरविंद शिंदे ,यांच्या हातात होता. मुकुंदराव पोफळे, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे,अशा ४० शेतकऱ्यांचे बैल या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दुष्काळी पाशर््वभूमीमुळे डोक्यावर मानाचे बाशिंग असले तरी यंदा शिंदे यांचा मनाच्या बैल आपल्या मूळ रूपातच मिरवणुकीत सहभागी झाला. अंगावर कोणताही रंग अथवा झूल पांघरली नाही. नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी यंदा कोणताही ढोल ताशांचा गजर न करता आपले बैल साध्या वाद्यावर मिरवणे पसंत केले. वाद्यासह खर्चात बचत करून ११ हजार रूपयाचा चारा दुष्काळी भागात जनावरांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप परदेशी यांनी आपले सफेद घोडे मिरवणुकीत आणले होते. रात्री ९ वाजता मिरवणूक आटोपली. मानाच्या बैलाने प्रथम येथील मोठे महादेव मंदिराच्या पायरीवर माथा टेकवला. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी सुमारे २०० बैलानी महादेवाचे दर्शन घेतले. राजे रघुजी शिंदे यांच्या मंदिरात दर्शन घेवून मिरवणूक संपली. मनमाड : मनमाड सह परिसरातील ग्रामीण भागात पोळा सण साजरा करण्यात आला.या वर्षी समाधानकारक पाउस न झाल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते.दुपार नंतर सजवलेले बैल गावाच्या वेशीजवळ आनण्यात आले. पोळा फोडण्याचा मान आपल्या बैलांना मिळावा या साठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. सुरेश सोळसे यांनी तुतारी वाजवल्यानंतर पोळा फोडण्यात आला. गावातील मारूती मंदिरा समोर बैलांची हजेरी लाउन गावातुन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.घराघरासमोर बैलांचे पुजन करुन पुरणपोळी खाउ घालण्यात आली.अनेक घरांमधे देवघरासमोर मातीच्या बैलांची पुजा करण्यात आली.साध्या पध्दतीने साजरा

खामखेडा: देवळा तालुक्यातील खामखेडा येथे पोळा सण दुष्काळ सावट आसल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बैलांच्या अंगावर रंग रंगगोटी करून मारु तीचे दर्शन घेण्यात आले. घरोघरी बैलाची पूजा करु न त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला.जोरण : येथे परंपरेनुसार गावांमध्ये बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी बैलांचे पूजन करण्यात आले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त कसबे सुकेणे : कसबे सुकेणे येथे पोळा वेस असल्याने याठिकाणी पोळयाचा मोठा उत्साह असतो. यंदा मात्र दरवर्षी प्रमाणे उत्साह दिसत नसला तरी मात्र गावच्या  प्रथेप्रमाणे  वेसीतुन पहिल्या बैलजोडया सोडण्याचा मान परंपरेप्रमाणे यंदा सदाशिव शेवकर्‍यांना देण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांनी बैलांना सजवुन पोळयात सहभागी करून मिरवणुक काढली. याप्रसंगी कसबे सुकेणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.