शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शाळांमध्ये होणार ‘स्वच्छ शाळा’ स्पर्धा

By admin | Updated: November 12, 2014 23:53 IST

सीईओ सुखदेव बनकरांची माहिती : तालुका व जिल्हास्तरावरून बक्षिसे

 नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता पुढील टप्पा म्हणून जिल्ह्णातील सर्व ३३६६ प्राथमिक शाळांमध्ये व खासगी शाळांमध्येही ‘स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यार्थी’ स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थी व प्रत्येक शाळेला या स्वच्छ शाळा अभियानात सहभागी व्हावे लागणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली.जिल्ह्णात या स्वच्छ शाळा अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि.१२) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांना जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलविण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून देशभरात स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ झाला असून, त्यानुसारच स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यालय या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. १४ ते १९ नोेव्हेंबर दरम्यान प्रत्येक अंगणवाडी व शाळांमध्ये ‘बाल स्वच्छ मोहीम’ राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक शाळेची तपासणी करण्यात येणार असून, ज्या शाळेला सर्वाधिक गुण मिळतील अशा तालुका स्तरावरील व जिल्हास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी तीन शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्वच शाळांना सहभाग घ्यावा लागणार असून ५० गुणांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या शाळांना या स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. या स्पर्धेत शाळेची व विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता तपासण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)