शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात भाजपा-सेना युतीसाठी प्राथमिक बैठक

By admin | Updated: October 22, 2016 00:00 IST

पालिका निवडणूक : ज्येष्ठ नेत्याच्या घरातील गुफ्तगूमध्ये युतीचे होकारार्थी संकेत

येवला : येवल्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-सेना युती करण्यासाठी गुरुवारी येवल्यात भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या घरात गुफ्तगू झाल्याच्या वृत्ताला नगरसेवकासह सेना ज्येष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला आहे. युतीचे होकारार्थी संकेत प्राथमिक बैठकीत मिळाल्याने युती झाली तर निवडणुकीत अधिकच रंग भरला जाणार आहे.गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजपा ज्येष्ठ नेते श्रीकांत गायकवाड यांच्या निवासस्थानी माजी आमदार कल्याणराव पाटील (भाजपा), जिल्हा बँक चेअरमन नरेंद्र दराडे, संभाजीराजे पवार (शिवसेना) यांच्या पुढाकाराने भाजपा-सेनेचे मुख्य नेते व काही कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत युती करायची की नाही याबाबत सर्वांनी होकार भरला असला तरी, अनेक बाबी स्पष्ट व्हायच्या आहेत. पालिका निवडणुकीबाबत झालेल्या चर्चेत नेते व कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. या चर्चेत लावलेला सूर असा, विधानसभेची जागा शिवसेनेकडे, तर शहराच्या नगराध्यक्षपदाची धुरा भाजपाकडे असे सूत्र परंपरेने ठरलेले आहे. याच तत्त्वावर तत्कालीन परिस्थितीत सेनेचे आमदार कल्याणराव पाटील होते, तर सन २००१ च्या पालिका निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सुशील गुजराथी होते. तत्कालीन परिस्थितीत भाजपाचा नगराध्यक्ष होऊ शकला नसला तरी, त्या सूत्राचा अवलंब केला तर भाजपाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी, तर उपनगराध्यक्षपद शिवसेनेला आणि नगरसेवकांच्या अधिकच्या जागा सेनेच्या वाट्याला द्याव्यात याबाबत चर्चा झाली. परंतु याबाबत अंतिम निर्णय झाला नाही.दरम्यान, नगराध्यक्ष निवडणूक लढवणारा उमेदवार सर्व दृष्टीने सक्षम व कोणीही असला तरी भाजपाच्या चिन्हावरच त्याची उमेदवारी असावी, अशी भूमिका कल्याणराव पाटील यांनी मांडली. आगामी दोन दिवसात पुन्हा एकदा बैठक घेऊन याबाबत विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)