शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा रोपांचे भावही गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:00 IST

मनोज बागुल। वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कांदा लागवडीला वेग आला असून, चालूवर्षी कांद्याला मिळालेल्या विक्र मी दरामुळे ...

ठळक मुद्देगहू, हरभरा लागवड क्षेत्र वाढणार । मजुरीचे दर दुप्पट; कांदा लागवडीला वेग

मनोज बागुल।वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कांदा लागवडीला वेग आला असून, चालूवर्षी कांद्याला मिळालेल्या विक्र मी दरामुळे यावर्षी कांदा रोपांचे दरही गगनाला भिडले आहेत. दुपटीने वाढलेले मजुरीचे दाम त्रासदायक ठरत आहेत. आहे तेवढी पुंजी काळ्या मातीत ओतताना शेतकरी दिसत आहेत. यावर्षी परिसरात गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या मात्र वाढण्याची शक्यता आहे.बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, वीरगाव, विंचुरे, कंधाणे, डोंगरेज, केरसाणे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी केल्या जात असून, चालू वर्षी खराब हवामान व परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची मर झाली असून, तुटवडा निर्माण झाला आहे. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी असून, तेथील मजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेला असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मजूरटंचाई निर्माण झाली असून, प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत असून, तेही रोजंदारीवर न येता कंत्राटी पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे तसेच मजुरीचे दरही वाढले आहेत. कांदा लागवडीसाठी २५० ते ३०० रु पये रोज असा दर झाला असून, बियाणे, खते आदींमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे.शेतकऱ्यांनी रोपे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे, परंतु शेतकऱ्यांना अधून-मधून पडणाºया ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात करावी लागते. त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकºयांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कांदा रोपे कमी झाल्याने यावर्षी परिसरात गहू व हरभरा पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. येणाºया काळात गहू, हरभरा पिकाला सुगीचे दिवस येण्याचे चित्र परिसरात दिसत आहे. विहिरींच्या पाण्याची पातळी चांगली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, यावर्षी कांद्याच्या दराने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. परतीच्या पावसाने परिसरात एक महिना मुक्काम केल्यामुळे सर्व काही होत्याचं नव्हतं झालं. कांदा रोपे, मका, बाजरी सर्व पिके एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. उधार-उसनवारीने पैसा उपलब्ध करून कांदा रोपे टाकली; पण पावसाने रडीचा डाव खेळून हाताला घास हिरावून घेतला असे कांदा उत्पादक जिभाऊ खैरनार यांनी संगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा