शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पांढुर्ली सोसायटीच्या अध्यक्षपदी वाजे

By admin | Updated: July 30, 2016 23:22 IST

बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई वाजे

पांढुर्ली : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पांढुर्ली येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी वाळू शिंदे, तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई विष्णू वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या महिन्यात झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजाभाऊ वाजे समर्थकांच्या शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १० जागांवर वर्चस्व मिळविले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी शिवाजी वाजे यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून चंद्रकांत गणपत वाजे, तर अनुमोदक म्हणून छगन तुकाराम पवार यांची स्वाक्षरी होती. उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मीबाई वाजे यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून तानाजी नामदेव वाजे, तर अनुमोदक म्हणून शिवाजी दगडू ढोकणे यांची स्वाक्षरी होती. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने अध्यक्षपदी शिवाजी वाजे, तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई वाजे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. यावेळी संचालक शिवाजी दगडू ढोकणे, जगन दत्तू वाजे, सुदाम बाबूराव वाजे, प्रभाकर रावळा भालेराव, सुशीला विष्णू ढोकणे, विराम यशवंत मोगले, अरुण शंकर वाजे यांच्यासह शांताराम ढोकणे, सुकदेव वाजे, शांताराम वाजे, विष्णू वाजे, शिवराम वाजे, विनोद भालेराव, दत्तू केदार, उत्तम वाजे, कुंडलिक वाजे, शिरीष बर्वे, सदू पवार, कैलास वाजे, रवींद्र ढोकणे, विकास वाजे आदि उपस्थित होते. सचिव किरण गोसावी, क्लार्क विलास वाजे यांनी निवडणूक कामात साहाय्य केले. (वार्ताहर)