शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

अध्यक्षपद खुले झाल्याने सर्वपक्षीयांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 8:10 PM

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले असून, त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सेनेकडून क्षीरसागर, दराडे यांचे नाव आघाडीवरविधानसभा निवडणुकीनंतर सेना व भाजपमध्ये झालेला दुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या असून, त्यातल्या त्यात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेत इच्छुकांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. राज्यात संभाव्य महाशिव आघाडीचा सुरू असलेल्या प्रयोगाचा विचार करता, सेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असली तरी, विद्यमान अध्यक्षदेखील या पदावर पुन्हा दावा करू शकतात.

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले असून, त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजता या आरक्षणाची माहिती जिल्हा परिषदेत येऊन धडकताच इच्छुकांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या शिवसेनेची असून, त्याखालोखाल राष्टÑवादी व भाजपची आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सेना व भाजपमध्ये झालेला दुरावा तसेच कॉँग्रेस, राष्टÑवादीची सेनेशी होत असलेले सख्य पाहता राज्यात महाशिव आघाडी अस्तित्वात आल्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहील व राष्टÑवादी, कॉँग्रेसकडे उपाध्यक्षपद तसेच सभापतिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याचीही शक्यता असून, त्यासाठी आगामी काळात राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सेनेतच इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या असून, बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांच्या नावांची चर्चा होत असली तरी, सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद खुले झाल्याने या पदासाठी कोणत्याही प्रवर्गातील सदस्य दावा करू शकतो. त्यामुळे भास्कर गावित या आदिवासी सदस्याच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. गेल्या अडीच वर्षांतील कार्यकाळातील जवळपास वर्षभर विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमध्येच वाया गेल्याने व उर्वरित काळात जिल्हा परिषदेचा गाडा चांगला हाकल्यामुळे विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे यांना पक्षश्रेष्ठींनी ठरविले तर पुन्हा संधी मिळण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. शिवसेनेला एकट्याच्या बळावर अध्यक्षपद मिळणे अशक्य असल्यामुळे महाशिव आघाडीचा प्रयोग झाल्यास विषय समित्यांच्या सभापतिपदासाठीही सेनेच्या इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद