शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक बरखास्तीचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:56 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या एकूणच कारभाराबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने त्याचबरोबर नाबार्डने केलेल्या आर्थिक निरीक्षक अहवालाच्या आधारे बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे सादर करण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली. विशेष म्हणजे, जिल्हा बॅँकेची सूत्रे भाजपाच्या ताब्यात गेली असली तरी, बरखास्तीची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या एकूणच कारभाराबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने त्याचबरोबर नाबार्डने केलेल्या आर्थिक निरीक्षक अहवालाच्या आधारे बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे सादर करण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली. विशेष म्हणजे, जिल्हा बॅँकेची सूत्रे भाजपाच्या ताब्यात गेली  असली तरी, बरखास्तीची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.  बॅँकेचे माजी संचालक व विद्यमान भाजपाचे आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी यासंदर्भात सहकारमंत्र्यांना लेखी प्रश्नाद्वारे माहिती विचारली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असणे, खातेदारांच्या खात्यांवर शिल्लक असूनही त्यांना पैसे परत न मिळणे, बॅँकेच्या धनादेश क्लेअरिंगचा परवाना रद्द झालेला असताना बॅँकेने अनावश्यक नोकर भरती केली आहे. त्यामुळे सभासद, खातेदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी सहकार खात्याने काय चौकशी केली, असा प्रश्नही विचारला होता. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या लेखी उत्तरात बॅँकेने १६ सेवकांची रोजंदारीवर नेमणूक केल्याचे मान्य केले असून, सहकार खात्याने सुरू केलेल्या चौकशीत कलम ८३ अन्वये नियुक्त प्राधिकृत अधिकाºयांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नुकसानीस बॅँकेच्या संचालक मंडळास दोषी ठरविल्याने कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बॅँकेची चौकशी सुरू असून, रोजंदारीवर नियुक्त केलेल्या १६ सेवकांना तत्काळ कमी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बॅँकेने विभागीय सहनिबंधकांकडे पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली, परंतु ती फेटाळण्यात आली आहे. 
आक्षेपांची पूर्तता केली नाही 
नाबार्डच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या निरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने बॅँकेने आक्षेपांची पूर्तता केली नाही. सबब बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बॅँकेवर प्रशासक नियुक्ती करण्याचा प्रस्ताव १२ जुलै रोजीच रिझर्व्ह बॅँकेकडे सादर करण्यात आला असून, अद्याप रिझर्व्ह बॅँकेने त्यास मंजुरी दिलेली नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक