शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला क्षेत्राचा प्रस्ताव तयार

By admin | Updated: July 22, 2014 00:51 IST

फेरीवाला क्षेत्राचा प्रस्ताव तयार

 

नाशिक : शहरात फेरीवाला क्षेत्र तयार करण्यासाठी महापालिकेतर्फे ३७ जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात आणखी क्षेत्र वाढविले जाणार आहे. त्याचप्रमाणे अधिक व्यवसायाचे क्षेत्र तसेच कमी व्यवसायाचे क्षेत्र अशी विगतवारी करण्यात येणार असून, त्या नुसार फेरीवाल्यांकडून कर आकारणी केली जाणार आहे.पालिकेने शहर फेरीवाला समितीची स्थापना केली असून, या समितीची बैठक उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महापालिकेने शहराच्या विविध भागात फेरीवाला क्षेत्रासाठी ३७ जागा निवडल्या असून, त्याचा प्रस्ताव या समितीवर मांडण्यात आला. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे अनेक भागांत वसाहती होत असून, त्यानुसार क्षेत्र वाढविण्याची मागणी केली. सदस्यांनी विविध जागा सुचविल्या तथापि, प्रस्तावित जागांची माहिती प्रभाग फेरीवाला समितीकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या सूचनेनुसार आणखी जागा वाढविण्यात येणार आहे. फेरीवाला क्षेत्रासाठी जागा निश्चित झाल्यानंतर क्षेत्रनिहाय फेरीवाल्यांकडून आकारणी केली जाणार आहे. सध्या सीबीएस येथे एका हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्याला दिवसाकाठी एक हजार रुपये मिळत असेल आणि आनंदवल्ली येथे एका विक्रेत्याला दिवसाकाठी दोनशे रुपये मिळत असतील तर आता त्याठिकाणी मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत कर आकारणी केली जाणार आहे. अ क्षेत्रात दोनशे रुपये तर ड क्षेत्रात अवघे २५ रुपये असे टप्प्याटप्प्याने आकारण्याचा प्रस्ताव आहे तसेच फेरीवाला नोंदणीसाठी पुण्यात पाचशे रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते नाशिकमध्ये ते तीनशे रुपये इतके आकारावे, अशी मागणी करण्यात आली. अशाच प्रकारे शासकीय दुग्ध विक्रेते, गटई कामगार तसेच अंपगांकडून जागा भाडे अल्पदरात आकारण्याची शासनाची तरतूद असून, त्यानुसार अन्य व्यावसायिकांच्या तुलनेत ५० टक्के कर आकारण्याच्या तरतुदीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. फेरीवाल्यांना अल्पदरात घरे उपलब्ध करून द्यावी तसेच राजीव आवास योजनेचा लाभ द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आॅगस्ट महिन्यात पुढील बैठक होणार आहे. आज झालेल्या बैठकीत दत्तात्रेय तळेकर, दिनेश जाधव, युनूस सय्यद, पुष्पाबाई वानखेडे, प्रकाश अहेर, संदीप भंवर, राजेंद्र दिंडोरकर, नवनाथ ढगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)