शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे गुणगान, सेनेचे चहापान‘

By admin | Updated: November 13, 2016 00:42 IST

नोटा’रेटी : बॅँकांसमोर नागरिकांना मोफत सुविधा

नाशिक : चलनातून पाचशे-हजारच्या नोटा बाद ठरविण्याऱ्या मोदी सरकारच्या निर्णयाचे भाजपेयींकडून गुणगान आणि जल्लोष केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेने शहरात ठिकठिकाणी बॅँकांसमोर रांगा लावून तासन्तास उभे राहिलेल्या नागरिकांसाठी मोफत चहापानाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकाही तैनात ठेवली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतल्यानंतर महानगर शिवसेनेने शनिवारी शहरात सुमारे ३५ ठिकाणी सेवाकेंद्र उभे करत भाजपाला एकप्रकारे खिजविण्याचाच प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू आहे. नाशकात सेना-भाजपात एकमेकांविरुद्ध वेगवेगळ्या माध्यमातून चढाओढ सुरू असते. दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहण्याची संधी शोधत असतात. फक्त निमित्ताचा अवकाश असतो. गेल्या मंगळवारी (दि. ८) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. बाद ठरलेल्या पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील सर्व बॅँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत. बॅँकेच्या नियोजित वेळेआधी पहाटेपासूनच नागरिक बॅँकांसमोर रांगा लावून प्रतीक्षा करताना दिसून येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तासन्तास उन्हातान्हात उभे राहिल्याने काहींना भोवळ आल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. एकीकडे नागरिक बॅँकांसमोर रांगा लावून नोटा बदलण्याच्या चिंतेत असताना मोदी सरकारच्या निर्णयाचे भाजपा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी स्वागत व जल्लोषही केला जात आहे. मोदी सरकारने काळा पैसा कसा बाहेर काढला याबाबतचे गुणगानही ऐकविले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ११) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सतावणाऱ्या या निर्णयाचा समाचार घेतल्यानंतर आणि राज्यात दोन ठिकाणी बॅँकांसमोर रांगेत उभे असलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना लक्षात घेऊन शिवसेनेने शनिवारपासून शहरातील प्रमुख बॅँकांसमोर ‘सेवाकेंद्र’ उभे करत रांगेत उभे असलेल्या नागरिकांच्या मोफत चहापानाची सोय केली आहे. सोबतच बिस्किट आणि चॉकलेटचीही व्यवस्था करण्यात आली आहे.