शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रगटदिनी गोदेचा जयघोष

By admin | Updated: February 7, 2017 00:32 IST

बुधवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पंचवटी : गंगा गोदावरी माता की जय, जय जय गंगा मय्या असा जयघोष करत सोमवारी (दि. ६) गोदा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटीतील गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे माघ मास गोदा जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या गोदा जन्मोत्सवांतर्गत गोदावरी मातेची महापूजा आणि अभिषेक, रंगनाथशास्त्री गायधनी यांच्या उपस्थितीत गोदापुराण तसेच श्रीकृष्णबुवा सिन्नरकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.६) गोदावरीचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी रामकुंड येथील श्री गंगा गोदावरी मंदिरात श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. तसेच दुपारी जन्मावेळी महाआरती व छप्पनभोग नैवेद्य अर्पण करण्यात आला. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. रामकुंडावरील श्री गंगा गोदावरी मंदिरात सकाळी चतुर्वेद शांतिसुक्त, श्री गणेश आदि स्थापित देवता पूजन, प्रधान देवता, षोडशोपचार पूजन करण्यात आले. दुपारी प्रधान देवता हवन, अर्चन, स्थापित देवता पूजन करण्यात येऊन आरती, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना करण्यात आली. जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी रक्तदान शिबिर, विश्वकल्याणार्थ पंचदिन साध्य, एकमुखात्मक शिवशक्ती महायज्ञाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.  तसेच बुधवारी (दि. ८) शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मंगल कार्यालयात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद दीक्षित यांनी दिली. जन्मोत्सव अंतर्गत घेण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी (दि. ९) गंगा गोदावरी सत्संग सभामंडप येथे संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे.  बुधवार (दि.८)पर्यंत गोदा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून, भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. हा जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रमोद दीक्षित (अध्यक्ष), निखिल देव (उपाध्यक्ष), प्रमोद देव, कल्पेश दीक्षित, आकाश क्षेमकल्याणी, संतोष पंचभय्ये, शिवाजी देव, सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)