शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या स्वायत्ततेला धोका ठरण्याची शक्यता?

By admin | Updated: April 30, 2017 02:12 IST

नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत एसपीव्ही ही कंपनी महापालिकेच्या स्वायत्ततेला आव्हान देणारी असल्याची भीती महासभेत सदस्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती

 नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत स्थापन झालेली एसपीव्ही अर्थात स्पेशल परपज व्हेइकल ही कंपनी महापालिकेच्या स्वायत्ततेला आव्हान देणारी असल्याची भीती महासभेत काही अभ्यासू सदस्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. ही भीती आता खरी ठरण्याच्या दृष्टीने कंपनीची पावले पडत असून, शनिवारी (दि.२९) झालेल्या बैठकीत महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी अप्रत्यक्षपणे रेटा वाढविला आहे.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर त्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या एसपीव्हीला मागील पंचवार्षिक काळात महासभेत सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यावेळी तत्कालीन उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत सदर एसपीव्ही अर्थात कंपनीकरण हे महापालिकेच्या स्वायत्ततेलाच आव्हान देणार असल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. स्मार्ट सिटीसंदर्भात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची बैठक सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुंटे यांनी सदर बैठकीत महापालिकेला काही बाबींमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी अभ्यास होण्याची गरज व्यक्त केली. त्यात प्रामुख्याने, महापालिकेने मालमत्ता दरात सुधारणा करणे आवश्यक असून, त्याबाबतचे दर निश्चित केले पाहिजे. तसेच महापालिकेला प्राप्त होणाऱ्या जाहिरात करातही सुधारणा होण्यासाठी अभ्यास होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. म्युनिसिपल बॉण्ड काढण्याचीही सूचना त्यांनी केली. ज्या पाण्याचा हिशेब लागत नाही, त्याबाबत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल स्मार्ट सिटी कंपनीच्या पुढील बैठकीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्याचे सांगितले. उत्पन्नवाढीसाठी महापालिकेने सुधारणा न केल्यास केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर परिणाम होऊ शकतो, असा सूचक इशाराही कुंटे यांनी दिला. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी कंपनीकडून रेटा वाढणार असून परिणामी, भविष्यात करवाढीचे संकेत मिळत आहेत. कंपनीकडून महापालिकेच्या स्वायत्ततेला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही, असे एसपीव्ही स्थापन करताना स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, आता महासभेच्या अधिकारांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)