शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायडोंगरीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 19:28 IST

ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथक ; रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४० हजार रुपयांच्या रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे़ पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, जुगार अड्डाचालक व चौघे जुगारी मात्र पोलिसांना चकमा देऊन फरार झाले आहेत.ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना न्यायडोंगरीमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी मनमाड-नांदगाव परिसरातील गस्तीवरील विशेष पथकाला कारवाईच्या सूचना दिल्यानंतर या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला़ मशिदीच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणारे संशयित मुस्तकिन बाबू अत्तार (२८, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव), नेमीचंद बिरदीचंद जैन (७१, रा. न्यायडोंगरी), विकास बाबासाहेब बोंडारे (२५, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), समाधान राजेंद्र आव्हाड (२१, रा. हातगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), गोकुळ गबलू राठोड (३८, रा. न्यायडोंगरी), दिलीप किसन राठोड (२७, रा. न्यायडोंगरी), संदीप ज्ञानदेव दिघोळे (२८, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), अखिल इमाम पिंजारी (३२, रा. न्यायडोंगरी) या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ पोलिसांनी जुगाऱ्यांकडून ४१ हजार ९६० रुपयांची रोख रक्कम, मोबाइल, नऊ दुचाकी असा ३ लाख ३५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ दरम्यान, या जुगार अड्ड्याचा चालक संशयित रफिक गणी शेख (रा. न्यायडोंगरी) याच्यासह चिंग्या आव्हाड, अविनाश आहेर, रवींद्र सोमवंशी, इलियास शहा, प्रदीप जयस्वाल, विठ्ठल राठोड (सर्व रा. न्यायडोंगरी) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.