शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तावरील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

By admin | Updated: October 16, 2014 19:00 IST

बंदोबस्तावरील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

 

नाशिकरोड : चेहेडी येथील मतदान केंद्रावर बंदोबस्ताला असलेल्या नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दशरथ जाधव यांचा कामाच्या ताणामुळे हृदयविकाराने मृत्यू झाला.नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले दशरथ दौलत जाधव (४८), रा. चित्रकूट सोसायटी, पंचवटी यांना मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात उपचार (सलाईन) घेऊन आज पहाटे ६ वाजता ते कामावर हजर झाले होते. जाधव यांना चेहेडी येथील मनपा शाळा मतदान केंद्रावर ग्राऊंड बंदोबस्तासाठी नेमलेले होते. कामाच्या ताणामुळे दुपारी ३ वाजेच्या सुमारास जाधव यांना छातीत दुखू लागल्याने व खूप घाम आल्याने सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. बिटको रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून त्यांना पंचवटीतील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येत होते. बिटको हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच उलटी होऊन तसेच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार असून, पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)