शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संशयिताच्या बचावासाठी पोलीसच सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:26 IST

पीडित मुली आणि त्यांच्या वडिलांना कोर्टकचेरी व बदनामीची भीती दाखवून एका विकृत तरु णाच्या बचावासाठी दस्तूरखुद्द पोलीस यंत्रणाच सरसावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.९) तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात उघडकीस आला.

सटाणा : पीडित मुली आणि त्यांच्या वडिलांना कोर्टकचेरी व बदनामीची भीती दाखवून एका विकृत तरु णाच्या बचावासाठी दस्तूरखुद्द पोलीस यंत्रणाच सरसावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.९) तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात उघडकीस आला.  बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील हे कुटुंब आहे. गेल्या शुक्र वारी दुपारच्या सुमारास हे कुटुंबीय पेरणीसाठी शेतात गेल्याच्या फायदा घेऊन एका विकृत तरु णाने घरात तीन मुली एकट्या असल्याचे पाहून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलींनी आरडाओरडा करून आपली सुटका करून घेतली. सायंकाळी आई-वडील शेतातून परत आल्यानंतर घडलेला प्रकार मुलींनी कथन केला. घडलेल्या प्रकार थेट गावच्या पोलीसपाटलांच्या कानावर घातला. पोलीसपाटलांनीदेखील या गंभीर प्रकाराबाबत जायखेडा पोलिसांत तक्र ार करण्याचा सल्ला दिला. यामुळे पीडित मुलींसह माता-पित्याने जायखेडा पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी तक्र ार घेणे तर दूरच त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात बसविण्याचा प्रयत्न केला. भलतेच प्रश्न विचारून कशाला कोर्टकचेरी मागे लागता. तुमच्या मुलींची बदनामी होईल, असा सल्ला जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व बीटच्या पोलीस कर्मचाºयांनी दिला. पोलिसांची ही भूमिका पाहून माता-पिता आवाक् झाले. पोलीस यंत्रणाच बदनामी आणि कोर्टकचेरीची भीती घालून गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत आजपर्यंत सिनेमातच बघितले होते. मात्र आज मी तो स्वत: अनुभव घेतला आहे. चिरीमिरीसाठी पोलीस कोणत्याही थराला पोहोचू शकतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जायखेडा पोलीस. आज माझ्यावर प्रसंग आला. उद्या त्या पोलिसांवर आला तर असाच सल्ला देणार का? चिरीमिरीमुळे गुन्हेगाराला पाठीशी घालणे म्हणजे गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचा प्रकार असून, अशा भ्रष्ट यंत्रणेमुळेच बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. अशा भ्रष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्र र करणार आहे.  - पीडित मुलींचे पिताघडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या प्रकरणातील गुन्हेगाराला पाठीशी घालणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची मी स्वत: चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. यापुढे कोणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत असेल किंवा भीती घालत असेल त्यांच्याबाबत तत्काळ लेखी तक्र ार करावी.- शशिकांत शिंदे, पोलीस उपअधीक्षक, मालेगाव ग्रामीण

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा